• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

by Ganesh Dhanawade
July 6, 2023
in Guhagar
114 1
0
Plantation of trees by Patpanhale College
224
SHARES
640
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सामाजिक वनीकरण विभाग गुहागर आणि वनविभाग गुहागर यांच्या सहकार्याने

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि  विज्ञान महाविद्यालयातील (Patpanhale College) एनएसएस विभागाच्या वतीने वन महोत्सव  सप्ताह अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 3 जुलै ते 8 जुलै या कालावधीत सामाजिक वनीकरण विभाग गुहागर आणि वनविभाग गुहागर यांच्या सहकार्याने पाटपन्हाळे येथील श्री देव गडगोबा देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. Plantation of trees by Patpanhale College

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णाजी शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सनई व डॉ. प्रसाद भागवत यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तृतीय वर्ष कला वर्गातील एनएसएस स्वयंसेवकांनी  वृक्षारोपण कार्यक्रमात सर्व ती मदत केली. यावेळी बदाम, चिंच, आवळा, बेल अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. महाविद्यालयामधील (Patpanhale College) कला शाखा विभाग प्रमुख प्रा. प्रमोद देसाई, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, डॉ.जालिंदर जाधव तसेच कार्यालयीन कर्मचारी संदीप चव्हाण यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. Plantation of trees by Patpanhale College

यावेळी गुहागर सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री. अमित निमकर गुहागर, श्री. संतोष परशेट्ये वनपाल गुहागर, वनरक्षक श्री. मांडवकर आणि वनरक्षक श्री. दुंडगे उपस्थित होते. महाविद्यालयाने या महिन्यात सुमारे ५० वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याचे नियोजन केले आहे. याबद्दल वनविभाग गुहागर यांचेवतीने शुभेच्छा देण्यात आल्या. Plantation of trees by Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPlantation of treesPlantation of trees by Patpanhale CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.