गुहागर, ता. 30 : ग्रामपंचायत साखरी आगर मार्फत नुकतेच वृक्ष लागवड करण्यात आली. निसर्गाचा समतोल राखून व पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे. व भौगोलिक पर्यावरण संतुलित राहण्याकरिता वृक्ष लागवड अतिशय उपयुक्त आहे. म्हणुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात आम्ही वृक्ष लागवड करत आहोत, असे ग्रामसेवक अनंत गावणंग यांनी सांगितले. Plantation of trees at Sakhari Aagar


या वृक्षलागवडीसाठी सरपंच दुर्वा दत्ताराम पाटील, उपसरपंच सुदाम आंबेरकर, सदस्य अनुराधा मोरे, सुरेश कदम, ग्रामसेवक अनंत गावणंग, ग्रामपंचायत शिपाई संतोष पाटील, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका उपस्थित होते. Plantation of trees at Sakhari Aagar

