• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिखली येथे कृषीदिनानिमित्त वॄक्षदिंडी

by Ganesh Dhanawade
July 1, 2024
in Guhagar
233 3
0
Plantation of trees at Chikhali
459
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वृक्षलागवडीच्या उपक्रमात ग्राम. चिखलीचा पुढाकार : बीडीओ प्रमोद  केळस्कर

गुहागर, ता. 01 : कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. कृषी दिनानिमित्त वृक्षलागवडीच्या स्तुत्य उपक्रमात ग्रामपंचायत चिखली व युवा सामर्थ्यगृप ने पुढाकार घेतल्याचे कौतुक करून आपण पर्यावरण रक्षणाचे मोलाचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी केले. पंचायत समिती, गुहागर, तालुका कृषी विभाग व ग्रामपंचायत चिखलीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत चिखली येथे कृषी दिन मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. Plantation of trees at Chikhali

यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ.मानसी कदम, उपसरपंच सुभाष दळवी, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, एस.के.-4 हळदीचे प्रणेते  सचिन कारेकर, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.सारीका वाडकर,  कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे प्रतिष्ठित नागरिक गणपत पाडावे हे होते. Plantation of trees at Chikhali

Plantation of trees at Chikhali

सर्वप्रथम  दिपप्रज्वलन करून गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर  यांच्या हस्ते स्व.वसंतराव नाईक व सरपंच मानसी कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे यांनी मान्यवरांचे सुपारीचे रोप व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रामाणिकपणे शेती केली तर शेतीतून चांगले अर्थार्जन होवून आत्मसन्मानाने जीवन जगू शकतो. त्यामुळे तरुणांनी शेतीत काम करावे, असे आवाहन एस.के.-4 हळदीचे प्रणेते व गारवा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सचिन कारेकर यांनी  केले. Plantation of trees at Chikhali

तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर यांनी स्व.वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत केलेल्या कार्यातील महती विशद केली. कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोपाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा  चिखली क्र.1 व 2 च्या विद्यार्थ्यांनी यावे॓ळी वृक्षदिंडी काढली. तसेच गुहागर-चिपळूण व चिखली- तळवली रस्तादुतर्फा वड व जांभूळ लागवडीचा शुभारंभही मान्यवरांसह  युवा सामर्थ्य गृप च्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे दुष्परिणाम  जि.प.शाळा क्र.2 च्या  विद्यार्थ्यांनी  केलेल्या मुकनाट्यातून सादर केले. Plantation of trees at Chikhali

Review of Guhagar Panchayat Samiti work

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर  व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे यांनी केले. यावे॓ळी  माजी सरपंच मंगेश कदम, कृषी अधिकारी  सर्जेराव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी प्रतिक जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय गमरे, निर्भय दळवी, सौ.निधी गांगण, साक्षी साळवी, सौ.मधुरा गोयथळे, पराग जोगळे, सौ.मधुरा सोलकर, मुख्याध्यापक मकरंद विचारे, मुख्याध्यापक सौ.आंबवकर युवा सामर्थ्य गृपचे दिनेश कदम, वाडीप्रमुख सचिन राऊत, सचिन गमरे,अशोक साळवी, अशोक गावणकर, कृषी सहाय्यक श्रीदेवी बाडगी, शिक्षकवृंद,अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रापं कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित  होते. Plantation of trees at Chikhali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPlantation of trees at ChikhaliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share184SendTweet115
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.