गुहागर, ता.18 : सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशाचे पालन करत वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे भेकरेवाडीच्या स्मशानभूमी मध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशच्या वतीने वन नेस वन अशा प्रकारे करण्यात आले. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत पाटपन्हाळे यांनी जागा उपलब्ध करून दिली. Plantation by Sant Nirankari Foundation


या वृक्षारोपण कार्यक्रमात जांभूळ, गुलमोहर, कोकम, कडूनिंब, पायरी, पिंपळ, ओवळ इत्यादी बहुपर्णीय झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार, उपसरपंच, सदस्य तसेच संत निरंकारी मंडळ (रजि. दिल्ली) शाखा तळवलीचे मुखी. प. पू. महात्मा दत्तात्रय किंजळे व तालुक्यातील साधसंगत तसेच रत्नागिरीचे क्षेत्राचे सेवा दलचे क्षेत्रीय संचालक महात्मा उमेश भागडे, सेवादल यूनिट नं. ८९६ चे संचालक चंद्रकांत कुळे व सर्व सेवादल उपस्थित होते. Plantation by Sant Nirankari Foundation


सदर कार्यक्रमाला क्षेत्रीय प्रबंधक महात्मा प्रकाश म्हात्रे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. केवळ वृक्षलागवड न करता पुढील तीन वर्षे लागवड केलेल्या झाडांची देखभाल व संगोपन केले जाणार आहे . या उपक्रमासाठी ग्रामपंचायत पाटपन्हाळे यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने प. पू. महात्मा दत्ताजय किंजळे (ब्रांच मुखी) यांनी आभार व्यक्त केले. Plantation by Sant Nirankari Foundation