भारताचे केवळ दशकच नाही तर शतक आहे ; पीयूष गोयल
गुहागर, ता.07 : भारत’ म्हणजे ‘संधींची खाण’ असून हे भारताचे केवळ दशकच नाही तर भारताचे शतक आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते सॅनफ्रान्सिस्को येथील स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. Piyush Goyal guided the students

भारताने गेल्या काही वर्षांत आपला पाया भक्कम करण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. यामुळे देश वेगाने परिवर्तन करू शकतो, तिची अर्थव्यवस्था वाढवू शकतो, व्यवस्थेत सुधारणा करु शकतो, तंत्रज्ञानाशी अधिक संलग्न होऊ शकतो आणि जगातील सर्वोत्तम गोष्टींकडून शिकू शकतो असे निरिक्षण गोयल यांनी नोंदवले. देशाच्या प्रत्येक नागरिकाला, देशात जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला चांगल्या दर्जाचे जीवन आणि उज्ज्वल भविष्य मिळण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारत प्रयत्नशील आहे यावरही त्यांनी भर दिला. Piyush Goyal guided the students

गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यातीने आधीच 675 बिलियन अमेरीकी डॉलर्सचा टप्पा ओलांडल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, देश आता 2030 पर्यंत आपला आंतरराष्ट्रीय व्यापार 2 ट्रिलियन अमेरीकी डॉलर्सपर्यंत नेण्याची आकांक्षा बाळगून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या भवितव्यासाठी काही सुदृढ व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित योजनांच्या माध्यमातून दूरदृष्टी स्पष्ट केली आहे. गोयल यांनी एलईडी दिवे क्रांतीचे उदाहरण दिले. 2014 मध्ये, पंतप्रधानांनी ऊर्जा क्षेत्रातील आपल्या गुंतवणुकीचा भार कमी करण्यासाठी आणि सामान्य माणसाचे वीज बिल कमी करण्यासाठी ऊर्जा संवर्धनावर अधिक लक्ष केंद्रित केले. आणि एलईडी दिवे कार्यक्रम ही योजना सुरू केली. 2015 मध्ये या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले. भारत आता अशा शेकडो परिवर्तनकारी कार्यक्रमांची योजना आखत आहे असे त्यांनी सांगितले. आज सर्व डिजिटल व्यवहारांपैकी 40 टक्के व्यवहार भारताबाहेर होत आहेत, अगदी लहान विक्रेतेही डिजिटल पेमेंट स्वीकारत आहेत असे भारताच्या फिनटेकच्या यशाबद्दल ते म्हणाले. Piyush Goyal guided the students

भारताने जगाला देऊ केलेल्या अतुलनीय संधींबद्दल बोलताना गोयल यांनी स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांना भारतासोबत जोडून घेण्याचे आणि मोठ्या आकांक्षा असलेल्या अब्जावधी लोकांसोबत काम करण्याचे निमंत्रण दिले. Piyush Goyal guided the students
