गुहागर, ता. 16 : जि. प. पू. प्रा. मराठी शाळा पिरंदवणे नं. १ येथे नूतन शैक्षणिक वर्षाचा स्वागत समारंभ ढोल-ताशांच्या गजरात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण आदी कार्यक्रमांसोबत विद्यार्थ्यांकडून उच्च गुणवत्ता संपादन करण्याविषयी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी सरपंच विश्वास घेवडे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष दशरथ घेवडे, ग्रा. पं. सदस्य प्रकाश गमरे यांच्या हस्ते नवनियुक्त शिक्षक कुलदीप देशमुख, सचिन इंगळे व योगेश मुळे यांचे स्वागत करण्यात आले. Pirandwane School ‘Entry Festival’
यावेळी मा. सरपंच सौ. माधवी गुरव, ग्रामस्थ अनंत मेस्त्री, सौ. गायत्री आंग्रे, सौ. दीप्ती गुरव, विद्या धोपट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ घेवडे यांच्या संबोधनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. Pirandwane School ‘Entry Festival’