रत्नागिरी, ता. 03 : पर्ससिनेट नौकेद्वारे होणाऱ्या मासेमारीला १ जानेवारी पासून बंदी आदेश लागू झाला आहे. हा बंदी कालावधी १ सप्टेंबर २०२४ पर्यंत असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २७९ पर्ससिन नौका असून या कालावधीमध्ये बेकायदेशीर मासेमारी होण्याची दाट शक्यता असते. एलईडीचा वापर होतो. हे रोखण्यासाठी मत्स्य आयुक्त विभाग सतर्क झाला आहे. गस्ती नौकेद्वारे यापुढे बेकायदेशीर मासेमारीवर विशेष लक्ष ठेऊन बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मत्स्य आयुक्त विभागाने स्पष्ट केले आहे. Perscene fishing banned in Ratnagiri district
शासनाच्या नव्या मासेमारी धोरणानुसार ही बंदी लागू झाली आहे. मासेमारी हंगामाचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी पर्ससीन नौका मालकांनी महिनाभर ठिय्या आंदोलन केले होते. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. केंद्र शासनाने शाश्वत मासेमारीसाठी हे कठोर निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवरील १ जानेवारी ते १ सप्टेंबर या कालावधीत बंदी लागू आहे. त्यानंतर १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पर्ससीन मासेमारी हंगाम असणार आहे. शासनाने अशा प्रकारे मासेमारीचा हंगाम निश्चित केला आहे. Perscene fishing banned in Ratnagiri district
परंतु पारंपारिक मच्छीमारांसह सर्व प्रकारच्या मासेमारीला १ जूनपासून बंदी होते. ती १ ऑगस्टला हा बंदी कालावधी उठतो. पर्ससीननेट मासेमारी आता १ जानेवारी ते १ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यांना राज्याच्या सागरी जलदीक्षेत्र असलेल्या १२.५ नॉटिकल मैलपर्यंत मासेमारी करू शकत नाही. त्यापुढे केंद्र शासनाची हद्द सुरू होते. या बंदी कालावधीत पर्ससीनद्वारे बेकायदेशीर आणि एलईडीद्वारे मासेमारी होण्याची शक्यता आहे. मत्स्य विभाग ही बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. गस्तीमध्ये वाढ केली असून परवाना अधिकाऱ्यांना बेकायदेशीर मासेमारीवर कारवाईचे आदेश दिले आहेत. Perscene fishing banned in Ratnagiri district