• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

by Ganesh Dhanawade
November 2, 2022
in Ratnagiri
28 0
2
54
SHARES
155
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्हा कोषागाराचे आवाहन

रत्नागिरी, ता 02 : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते. अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी हयात असलेबाबतचे “हयात प्रमाणपत्र” (Life Certificate) ०१ नोव्हेंबर २०२२ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सादर करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे. Pensioners should submit life certificate

संबंधित निवृत्तीवेतनधारकाचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी कोषागार कार्यालयाकडुन संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असलेबाबत बँक मॅनेजरचे समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. सदरची घोषणापत्रे संबंधीत बँकांकडे पाठविणेत आलेली आहेत. पुनर्नियुक्त/ पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन / निवृत्तीवेतन धारकांकरीता नियमित नमुना वापरावा. Pensioners should submit life certificate

मनिऑर्डरव्दारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडुन संबंधितांचे पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वत:चे हयात दाखले स्वाक्षरीसह पुर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी. याबाबत अधिक माहितीसाठी कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे. Pensioners should submit life certificate

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPensioners should submit life certificateUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.