• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात शांततेत मतदान, नवमतदारांमध्ये उत्साह

by Mayuresh Patnakar
May 8, 2024
in Politics
139 1
1
Peaceful voting in Guhagar

चिखली मतदान केंद्रावर सायंकाळी 5.00 असलेली गर्दी

273
SHARES
779
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 08 : गुहागर तालुक्यात अत्यंत धीम्या गतीने, शांततेत लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. 56.43 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान करण्यास पसंती दिल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन समोर येत आहे. दुपारी 1 ते 3 या काळात केवळ 4.57 टक्केच मतदान झाले. Peaceful voting in Guhagar

Peaceful voting in Guhagar
गुहागर वरचापाट येथील मतदान केंद्रावर 10.30 वाजता झालेली गर्दी

सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली त्यावेळी मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. सकाळी 7 ते 9 या दोन तासांत केवळ 9.50 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदान केंद्रांवर थोडीफार गर्दी दिसू लागली. 9 ते 11 या कालावधीत मतदानाचा टक्का 16 टक्क्यांनी वाढला. 11 ते 1 या कालावधीत 13.93 टक्क्यांनी मतदान वाढले. दुपारी 1 ते 3 या काळात केवळ 4.57 टक्केच मतदान झाले. त्यानंतर पुन्हा मतदानाची गती वाढली. सायंकाळच्या दोन तासांत 9.77 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77 टक्के मतदान झाले आहे. Peaceful voting in Guhagar

Peaceful voting in Guhagar
प्रथम मतदान केल्यानंतर आनंद व्यक्त करणारे नव मतदार

दरवर्षी मतदानाचे दिवशी कार्यकर्त्यांची मतदारांना केंद्रापर्यंत घेवून जाण्यासाठी असणारी लगबग, वाहनांची वर्दळ, बुथवर गर्दी असे चित्र दिसून येते. यावेळी मतदार, कार्यकर्ते यांच्यात फारसा उत्साह दिसून आला नाही. संथपणे एका लयीत मतदान सुरु होते. गुहागर तालुक्यातील नोकरी उद्योगासाठी परगावी असलेल्या मतदारांची संख्या जवळपास 15 ते 20 हजार आहे. या मतदारांसाठी राजकीय पक्षांकडून गाड्यांची व्यवस्था केलेली असते. यावेळी मात्र अशी कोणतीही वाहन व्यवस्था दोन्ही राजकीय गटांनी केल्याचे दिसून आले नाही. नवमतदारांमध्ये, तरुणांमध्ये मतदान करण्याचा उत्साह होता. पर्यटन विकास, देशाची प्रगती, राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मजबुती आणि रोजगार या मुद्द्यांवर मतदान केल्याचे सोहम वैद्य, रुही मावळंकर, यश फडके आणि अथर्व घाणेकर या नव मतदारांनी सांगितले.  Peaceful voting in Guhagar

Peaceful voting in Guhagar
गुहागर वरचापाट येथील याच दुकानात मतदानाची खूण दाखवल्यावर साखर सवलतीच्या दरात मिळणार

मतदान केलेल्यांना सवलतीलच्या दरात साखर

गुहागर वरचापाट येथील गोखले स्टोअर्सचे तरुण व्यावसायिक अद्वैत गोखले यांनी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून एक उपक्रम केला. मतदानाच्या शाईची खूण दाखविणाऱ्या मतदाराला प्रति किलो 2 रु. सवलतीच्या दरात साखर देण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. ही योजना  गुरुवार 9 मे पर्यंत सुरु रहाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह यावा, 100 टक्के मतदान व्हावे म्हणून हा छोटासा प्रयत्न मी करत असल्याचे अद्वैत गोखले यांनी सांगितले.  Peaceful voting in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPeaceful voting in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.