देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजन
रत्नागिरी, ता. 21 : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जय शिवाजी, जय भारत या संकल्पनेवर आधारित शिवजयंतीनिमित्त शहरातील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने (एनएसएस) पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. Paying homage to Shivaji by taking out a padayatra


या पदयात्रेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, भारत शिक्षण मंडळ संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, सदस्य विनायक हातखंबकर, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी सचिन सनगरे, नवनिर्माण महाविद्यालयाचे प्राध्यापक, देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, एनएसएस विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते. Paying homage to Shivaji by taking out a padayatra


पदयात्रेची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन, शिवगर्जना करून करण्यात आली. या पदयात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, देखावा रथ, ढोलपथक, लेझिम पथक सहभागी होते. यामध्ये महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी जोरदार घोषणांच्या गजरात सहभाग घेतला. जल्लोषपूर्ण वातावरणात ही पदयात्रा महाविद्यालय, आठवडा बाजार, राम आळी, गोखले नाका, सावरकर चौक, शेरे नाका, टिळक आळी, काँग्रेस भवनमार्गे आठवडा बाजार पुन्हा देव वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. Paying homage to Shivaji by taking out a padayatra