• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भंडारी भवनचे पेव्हिंग ब्लॉक वादात

by Mayuresh Patnakar
March 21, 2025
in Guhagar
259 3
0
Paving block of Bhandari Bhavan in controversy

Paving block of Bhandari Bhavan in controversy

509
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव यांनी केली चौकशीची मागणी

गुहागर, ता. 21 : शहरातील गुहागर तालुका भंडारी भवन समोरील मैदानाला सन 2022-23 या आर्थिक वर्षात नगरोत्थान निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. याबाबत कल्पेश कृष्णा गुरव यांनी संबंधित जागेचा ताबा कोणाकडे आहे. अशा अर्थाचे पत्र जिल्हाधिकारी यांना लिहिले. या पत्राच्या अनुषंगाने आमदार जाधव यांनी नगरविकास खात्याचे सचिव, आयुक्त यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. Paving block of Bhandari Bhavan in controversy

उपयुक्त भंडारी भवन

गुहागर तालुक्यातील भंडारी समाजाचे शहरात सुमारे 1 हजारहून अधिक आसन क्षमतेचे सभागृह बांधले. या इमारतीसमोर वाहनतळासाठी मोठी जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात सभागृहाची मोठी व्यवस्था उभी राहीली. तालुकावासीयांना लग्नादी समारंभांसाठी, राजकीय पक्षांना सभेसाठी आणि शासनाला त्यांचे उपक्रम राबविण्यासाठी तालुक्याचे ठिकाणी सभागृह उपलब्ध झाले. इमारतीसमोर वाहनतळासाठी मुबलक जागा उपलब्ध असली तरी पावसाळ्यात या मैदानात पाणी साचत असे. त्यामुळे चिखलमाती तुडवत सभागृहात येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सभागृहासमोरील मैदानाला पेव्हिंग ब्लॉक बसवून द्यावेत अशी मागणी तत्कालीन भंडारी समाजाच्या ट्रस्टींनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. Paving block of Bhandari Bhavan in controversy

पालकमंत्र्यांची मान्यता

शासनासह, तालुकावासीय, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांसाठी हे उपयुक्त सभागृह असल्याने इमारतीसमोरील मैदानाला पेव्हिंग ब्लॉक बसवले तर सर्वांचीच सोय होईल. या उद्देश्याने भंडारी समाजाची ही मागणी मान्य झाली. गुहागर नगरपंचायतीला या कामासाठी नगरोत्थानमधुन निधी उपलब्ध झाला. जागा मालक असलेल्या संस्थेकडून त्यावेळी संमतीपत्र घेवून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले. Paving block of Bhandari Bhavan in controversy

जागेचा ताबा कोणाचा

दरम्यानच्या काळात कल्पेश कृष्णा गुरव रा. गुहागर खालचापाट ब्राह्मण वाडी यांनी 20 ऑगस्ट 2024 व 20 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र लिहिले. यामध्ये भंडारी भवन या इमारतीसमोरील मैदानाला पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम नगरपंचायतीने काम केले  त्यावेळी भंडारी समाजाकडून जागेचा ताबा घेतला असेलच, त्यामुळे सदर जागा नगरपंचायतीच्या नावे झाली असेल. सदर जागा सार्वजनिक असून सुध्दा गुहागर तालुका भंडारी समाज सदर ठिकाणी कंपाऊंड व गेट बसवून मालकी सांगत आहे. सदर जागेतून जाणाऱ्या लोकांना मज्जाव करत ‍आहे. तरी हे कपाऊंड व गेट काढून नागरिकांसाठी खुला करावा. जर नगरपंचायतीने जागा आपल्या नावावर केली नसेल तर नगरपंचायत प्रशासनावर योग्य ती कार्यवाही करावी असे नमुद केले होते. Paving block of Bhandari Bhavan in controversy

आमदार जाधव यांची चौकशीची मागणी

या पत्रांचा संदर्भ देत आमदार भास्कर जाधव यांनी 3 मार्च 2025 रोजी सचिव नगरविकास मंत्रालय, आयुक्त कोकण विभाग आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र लिहिले. यामध्ये नगरोत्थान सारख्या निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर व पदांचा दुरुपयोग करुन शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावीच तसेच संबंधितांकडून बेकायदेशीररित्या खर्च केलेला निधी सक्तीने वसूल करण्यात यावा. करत असलेल्या कारवाईची माहिती द्यावी असे कळविले आहे. Paving block of Bhandari Bhavan in controversy

तक्रारदार निघाला खोटा

आमदार भास्कर जाधव यांनी नगरविकास मंत्रालयापासून जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पेव्हिंग ब्लॉकच्या कामाबाबत कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले. समाज संस्थेनेच या कामाची मागणी केली होती. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा ठपका नगरपंचायत प्रशासनाकडून भंडारी समाज संस्थेवर येऊ शकतो. त्यामुळे समाज संस्थेच्या ट्रस्टींनी तक्रारदार कल्पेश गुरव याचा शोध सुरु केला. तेव्हा गुहागरशेजारील असगोली ग्रामपंचायत हद्दीत त्यांना कल्पेश कृष्णा गुरव ही व्यक्ती सापडली. ट्रस्टींनी या व्यक्तीची चौकशी सुरू केल्यावर या व्यक्तीने अशाप्रकारची कोणतीही तक्रारच केलेली नसल्याचे समोर आले. तक्रारदाराच्या अर्जावरील पत्ता, सही या दोन्ही गोष्टी आपल्या नसल्याचे कल्पेश गुरवने सांगितले. हे लक्षात आल्यावर कल्पेश गुरवकडून मुख्याधिकारी नगरपंचायत गुहागर यांच्यानावे पत्र तयार करण्यात आले. या पत्रात कल्पेशने म्हटले आहे की माझ्या नावाने केलेले दोन्ही अर्ज हे मी केलेले नाहीत. अज्ञात इसमाने माझे नाव वापरुन हे अर्ज केलेले आहेत. त्यामुळे भंडारी भवन येथे बसविण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉक संदर्भात माझी कोणतीही तक्रार नाही. याच पत्रासोबत कल्पेश गुरवने प्रतिज्ञापत्र ही सादर केले आहे. Paving block of Bhandari Bhavan in controversy

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPaving block of Bhandari Bhavan in controversyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share204SendTweet127
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.