• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धांमध्ये यश

by Ganesh Dhanawade
September 30, 2024
in Sports
166 2
0
Patpanhale College's success in competitions
326
SHARES
931
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सात स्पर्धा जिंकून विशेष विजयी कौशल्य

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स ) नुकत्याच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. Patpanhale College’s success in competitions

गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा नुकतीच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, ८००मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर धावणे, पाच कि.मी चालणे, १०० मीटर, ४०० मीटर हर्डल्स, थाळी फेक, गोळा फेक, भालाफेक, ४× १०० , ४× ४०० रीले, क्रॉसकंट्री, लांबउडी उंचउडी हे मैदानी खेळ खेळवण्यात आले. Patpanhale College’s success in competitions

पाटपन्हाळे महाविद्यालयातील १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक – तीन, रौप्यपदक –  पाच, कांस्यपदक – एक, १४ वर्षांखालील मुली गटातील खेळाडूंनी सुवर्णपदक – एक, रौप्यपदक – दोन तसेच १७ वर्षांखालील मुले गटात सुवर्णपदक – सात, रौप्यपदक –  चार, कांस्यपदक – तीन, १७ वर्षाखालील मुली गटात सुवर्णपदक – दोन, कांस्यपदक –  तीन तसेच १९ वर्षाखालील मुले गटामध्ये सुवर्णपदक – तेरा, रौप्यपदक – दहा व कांस्यपदक –  दोन तसेच १९वर्षांखालील मुली गटात सुवर्णपदक – बारा, रौप्यपदक -पाच व कांस्यपदक –  पाच अशी स्पर्धेमधील ७८ पदके संपादन करून पाटपन्हाळे महाविद्यालयीन खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे कौशल्य सादर करून विजयाचे सुयश संपादन केले. दहापैकी सात रिले स्पर्धा जिंकत पाटपन्हाळे महाविद्यालयाने विजयी क्रिडा यश संपादित केले. Patpanhale College’s success in competitions

महाविद्यालयीन खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख श्रीम. एस.एस. मोरे , श्री. व्ही.व्ही. पवार, श्रीम. आरती जोशी – शिगवण, रत्नागिरी जिल्हा शारीरिक शिक्षण संघाचे खजिनदार व शारीरिक शिक्षक संघ गुहागरचे तालुकाध्यक्ष श्री. संजीव मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. गुहागर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयाने सुयश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी. डी. नेरले, प्राध्यापक – शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी पालकांनी विशेष अभिनंदन केले. Patpanhale College’s success in competitions

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPatpanhale College's success in competitionsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share130SendTweet82
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.