लेखक अॅड. पाटणे; रत्नागिरी भेटीचे दिले निमंत्रण
रत्नागिरी, ता. 08 : केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांची रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक अॅड. विलास पाटणे यांनी संसदेत भेट घेतली. यावेळी अॅड. पाटणे यांनी स्वतः लिहिलेले रामशास्त्री हे पुस्तक भेट दिले. रत्नागिरी ही लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यभूमी. यामुळेच मेघवाल यांना रत्नागिरीचे आकर्षण असून त्यांना रत्नागिरी भेटीचे निमंत्रण अॅड. पाटणे यांनी यावेळी दिले. Patne met Union Law Minister Arjun Meghwal


श्री. मेघवाल यांनी पाटणे यांच्या लेखन आणि पुस्तकांबधी आस्थेने चौकशी केली. साहित्यिक अॅड. पाटणे यांच्यासमवेत भेटीप्रसंगी केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. श्री. मेघवाल हे सलग चार वेळा बिकानेरमधून (राजस्थान) संसदेवर निवडून गेले. तीन वेळा सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. या भेटीनंतर अॅड. पाटणे यांनी सांगितले की, राजकारणात मूल्यावर विश्वास ठेवून काम करणारी माणसं भेटली की व्यवस्थेवरचा विश्वास वाढत जातो. साधा सरळ स्वभाव, थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि सामाजिक भान असलेली दृष्टी यातून मेघवाल यांचे व्यक्तित्व भावले. त्यांनीही “एक सफर हमसफर के साथ” ‘विश्वपटलपर गांधी’ सारखी तीन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या पगडीवरून राजस्थानी संस्कृतीचं अनोखं दर्शन होतं ते वेगळेच. atne met Union Law Minister Arjun Meghwal
पॉलिटिकल सायन्समधून एमए, नंतर एलएलबी आणि फिलिपिन्स विद्यापीठातून एमबीए पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे पोस्टात टेलिफोन ऑपरेटरची नोकरी करुन त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. आयएएस म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय केला. सरकारी गाडीचा ते कधीच वापर करीत नाहीत. सामाजिक भान ठेवून समाजपयोगी अनेक कामे करीत असतात. भावना ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड कामे केली असून या सर्व विषयांवर यावेळी गप्पा रंगल्या. Patne met Union Law Minister Arjun Meghwal