• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रुग्णसेवक चषक क्रिकेट स्पर्धा

by Manoj Bavdhankar
March 20, 2024
in Maharashtra
83 1
0
Patient Cup Cricket Tournament
163
SHARES
466
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित स्पर्धा उत्साहात संपन्न

गुहागर, ता. 20 : गुहागर विधानसभा मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या मार्फत नुकतेच करण्यात आले हेते. ही स्पर्धा विरार येथील प्रसिद्ध नारंगी मैदान येथे संपन्न झाली. स्थानिक तरुणांना स्पर्धेचे मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये गुहागर विधानसभा मतदार संघातील एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदविला. Patient Cup Cricket Tournament

या वैद्यकीय टीमच्या वतीने रुग्णसेवक चषक आयोजित करून स्पर्धेतील सर्व निधी गोर गरीब रुग्णांसाठी वापरला जाणार आहे. या वैद्यकीय टीमची स्वतःची एक ५०० चमूची मेडिकल टीम कार्यरत आहे. या वैद्यकीय टीमच्या मार्फत आजतागायत ७००० हजारहून अधिक गोरगरीब रुग्णांना सेवेचा लाभ झाला आहे. त्यातील अनेकांच्या शस्त्रक्रिया स्वखर्चाने केल्या. या टीमच्या मार्फत ते खेड्यापाड्यात मेडिकल कॅम्पही भरवतात. Patient Cup Cricket Tournament

सदर स्पर्धेचे उद्घाटन भाजपा ओबीसी मोर्चा सेलचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.संतोषदादा जैतापकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर संजीवनी हॉस्पिटलचे सेक्रेटरी व वसई जनता बँकेचे अध्यक्ष श्री.महेश देसाई यांचे हस्ते क्रीडांगणावर श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता आबलोली संघास ३३ हजार ३३३ रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक विजेता श्री.जुगाई देवी संघ भातगाव यांस २२ हजार २२२ रुपये व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक विजेता पाणबुडी देवी क्रिकेट संघ पाचेरी सडा यांस ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या सर्व रुग्णसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. Patient Cup Cricket Tournament

या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले भाजपा कोकण विकास आघाडी विरार शहराध्यक्षा स्नेहा शिंदे, भाजपा नालासोपारा विधानसभा प्रमुख श्री.राजन नाईक, भाजपा पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री.मनोज बारोट, भाजपा विरार शहराध्यक्ष नारायण मांजरेकर, लोकनेते हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी), वसई- विरार महानगरपालिका मा.सभापती यज्ञेश्वर पाटील, स्थानिक नगरसेवक सदानंद पाटील, शिवराज्य ब्रिगेड बांद्रा अध्यक्ष आदेश जाधव, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबईचे श्री. मनोहर गुरव, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरीचे सरचिटणीस श्री. संकेत हुमणे व यासारखे ३५० हून अधिक इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित दर्शवली. Patient Cup Cricket Tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPatient Cup Cricket TournamentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.