• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथील स्प्रिंग्समध्ये ‘पेशंट असिस्टंट’ कोर्स सुरू

by Mayuresh Patnakar
July 21, 2026
in Health
34 0
0
'Patient Assistant' course starts
67
SHARES
190
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोग्य क्षेत्रात करिअरची संधी; पहिल्या १० विद्यार्थ्यांना विद्यावेतन

गुहागर, ता. 21 : आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन चिपळूण येथील स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे ‘पेशंट असिस्टंट’ हा व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कोकणातील युवक-युवतींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून मर्यादित जागा उपलब्ध असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. या कोर्समध्ये प्रथम प्रवेश घेणाऱ्या दहा उमेदवारांना विद्यावेतन देण्याची विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. अभ्यासक्रमामध्ये रुग्णांची काळजी घेणे, दैनंदिन सेवांमध्ये मदत करणे तसेच रुग्णालयातील विविध कामकाजासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘Patient Assistant’ course starts

प्रशिक्षणादरम्यान अनुभवी डॉक्टर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, हॉस्पिटल इंटर्नशिप आणि रुग्णालयाभिमुख अभ्यासक्रमाचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट सहाय्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटर, ओल्ड एज केअर सेंटर, होम केअर सेवा तसेच परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा संस्थेचा दावा आहे. ‘Patient Assistant’ course starts

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जेड गार्डन, स्वर विहार, खेंड, चिपळूण येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ९७३०९०६२१६, ७९९८४९४९४९, ९६७३९५६५१४, ७५८८४७७६९० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘Patient Assistant’ course starts

Tags: 'Patient Assistant' course startsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share27SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.