नागरिकांना चिखलमातीतून करावा लागतोय प्रवास
गुहागर, ता. 10 : तालुक्यातील कुटगिरी पातेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. साधारणत: दीड किमी लांबीच्या चिखल मातीच्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याची भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहीती दिली होती. Pathetic condition of road in Kutagiri

या वाडीत साधारणतः ८० घरे असून २५० लोकसंख्या असलेली वाडी आहे. अनेक वर्षापूर्वी येथील अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्याही रस्त्याला खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती कुटगिरी पातेवाडी येथील नागरिकानी श्रमदानातून केली होती. आता पावसाळ्यात या रस्त्याला खड्डे पडले आहेत. ग्रामस्थांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्याशी भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहीती दिली. परंतु, आश्वासनापलीकडे त्यांच्या काहीच हाती आले नाही. Pathetic condition of road in Kutagiri

हा रस्ता उतार भागाचा असल्याने चिखलमातीतून वाहने चालवताना वाहने घसरून अपघात होत आहेत. काही वर्षापूर्वी या रस्त्यावरून एसटी वाहतुक सुरु होती. पंरतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे एसटी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तरी कुटगिरी पातेवाडीकडे जाणाऱ्या या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी कुटगिरी पातेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. Pathetic condition of road in Kutagiri
