• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथील प्रा.मीना कश्यप यांनी मिळविले पेटंट

by Ganesh Dhanawade
January 22, 2023
in Guhagar
77 1
0
Patent obtained by Meena Kashyap
151
SHARES
431
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अभियांत्रिकी महाविद्यालय मधील इंस्टूमेटेंशन अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका

गुहागर, ता. 22 :  वेळणेश्वर येथील विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय मधील इंस्टूमेटेंशन अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. मीना कश्यप यांनी पेटंट मिळविण्यात यश मिळविले आहे. त्यांना ‘लहान आणि मोठ्या उद्योगांसाठी जोखीम कमी करणारे उपकरण’ या विषयावर पेटंट मिळाले आहे. Patent obtained by Meena Kashyap

लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. गेल्या काही दशकांमध्ये लोकांना कामावर आणि घरी आराम करण्यास मदत करण्यासाठी खूप अशा मशिन्स बनवल्या आणि डिझाईन केल्या गेल्या. मशीनमुळे लोकांचे गंभीर शारीरिक नुकसान झाले. प्रसंगी त्यांचे प्राणही गेले आहेत. अशा परिस्थितीत लोकांचे जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी या शोधाचा वापर मशिन्सच्या सहाय्याने केला जाणार आहे. सदर पेटंट दिनांक १३ जानेवारी २०२३ च्या ‘इंडियन पेटंट ऑफिस’ या नियतकालिकेमध्ये प्रकाशित झाला. Patent obtained by Meena Kashyap

Patent obtained by Meena Kashyap

प्रा. मीना कश्यप त्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, विभागप्रमुख केतन कुंडीया व इतर शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. Patent obtained by Meena Kashyap

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPatent obtained by Meena KashyapUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.