अखेर मनसे कार्यकर्त्यांच्या दणक्याने आगार प्रमुखांनी केली गाडीची व्यवस्था
गुहागर, ता. 01 : चिपळूण रेल्वे स्थानक गुहागर एसटी रेल्वे येण्यापूर्वीच चिपळूण रेल्वे स्टेशन येथून सोडल्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करण्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी येथील आगार व्यवस्थापकांना दणका देताच त्यांनी प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था केली. Passengers suffer as bus leaves prematurely
दररोज चिपळूण रेल्वे स्टेशन येथे रेल्वे आल्यानंतर सुटणारी एस.टी. रेल्वे येण्यापूर्वीच निघून गेल्याने संतप्त प्रवाशांनी चिपळूण रेल्वे स्टेशन येथे गुहागर डेपोला संपर्क करण्यास सुरुवात केली. परंतु संपर्क न झाल्याने अखेर संतप्त मनसे दिवा शाखेच्या अध्यक्ष अंकिता कदम व इतर प्रवाशांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांना माहिती दिली. अनेक प्रवाशी गुहागर व अन्य मार्गावर उतरणारे होते. प्रवाशांनी माहिती दिल्यानंतर विनोद जानवळकर यांनी मध्यरात्री गुहागर आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून चिपळूण रेल्वे स्टेशन- गुहागर एस.टी. रेल्वे येण्यापूर्वीच मार्गस्थ झाली. असून चिपळूण येथे मध्यरात्री गुहागरकडे येणारे प्रवासी अडकले आहेत. प्रवाशांना गुहागरकडे येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. या प्रवाशांना दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत ताटकळत राहावे लागणार आहे. याची कल्पना दिल्यानंतर चिपळूण आगारात गुहागर आगाराची वस्तीची असलेली चिपळूण गुहागर एस.टी. तात्काळ सोडण्याचे आदेश आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी वाहक व चालकांना दिले. Passengers suffer as bus leaves prematurely
सर्व प्रवाशांनी आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी मनसेचे गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, मुंढर गाव शाखा अध्यक्ष सुजित गांधी यांनी गुहागर आगारामध्ये जाऊन रात्रीची चिपळूण स्टेशन गुहागर एस.टी.रेल्वे आल्याशिवाय सोडण्यात येऊ नये अशी विनंती केली. पुढील काळात असा प्रकार होणार नाही याची खबरदारी गुहागर आगाराकडून घेतली जाईल. तसेच प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन गुहागर आगाराचे शिंदे यांनी दिले. Passengers suffer as bus leaves prematurely