गुहागर, ता. 27 : २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. हा पुरस्कार दर्जेदार गुणवंत व सकस लेखन करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. आत्तापर्यंत अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Pasaydan State Level Poetry Award
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/07/new-1-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/07/new-1-1.jpg)
सदर पुरस्कार उत्कृष्ठ कविता संग्रहासाठी प्रदान करण्यात येतो. २०२१ चे पसायदान राज्यस्तरिय काव्यपुरस्कार नुकतेच मान्यवर परीक्षकांकडून जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कवी रमझान मुल्ला यांच्या “अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत”, प्रसिद्ध साहित्यिका प्रतिभा सराफ यांच्या “उमलावे आतुनिच”, प्रसिद्ध चित्रकार, संपादक, कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या “काही सांगताच येत नाही” या संग्रहांना राज्यस्तरिय पसायदान काव्यपुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/07/add-..png)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2022/07/add-..png)
या पुरस्कारकर्त्याना प्रत्येकी रोख रक्कम ३००० ₹, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते साहित्य सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. असे पसायदान प्रतिष्ठान यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. पुरस्कार प्राप्त कवींचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. Pasaydan State Level Poetry Award