गेल्या २० वर्षांची अखंड परंपरा गावाने जोपासली
गुहागर, ता.02 : तालुक्यातील दाभोळ खाडीपट्टयात अत्यंत ग्रामीण भागात असलेली परचुरी ग्रामपंचायत बिनविरोध ठरली आहे. गावाने एकत्र बसून थेट सरपंचसह उपसरपंच पदावर ही एकमत केल्याने ही ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल ठरली आहे. Parchuri Gram Panchayat unopposed
परचुरी या ग्रामीण भागातील ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुका जाहिर झाल्यावर परंपरेप्रमाणे यावेळी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस बाळगून गावातील सर्व सहा वाडी प्रमुखांनी एकत्र बैठक घेतली. ग्रा. पं. च्या तीन प्रभागात निवडून द्यावयाच्या सात सदस्यांची एकमताने निवड केली. त्यानुसार अशोक भुवड, सुविधा भुवड, रसिका भुवड, अविनाश गमरे, अपेक्षा पवार, अंजली डाफळे व संदिप डाफळे असे सात उमेदवार निश्चित करण्यात आले. त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दाखल केलेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरल्यामुळे हे उमेदवार निवडून आले आहेत. Parchuri Gram Panchayat unopposed
गावचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या पदासाठी प्रतिक्षा प्रदिप भुवड या महिलेची सर्वानुमते निवड करण्यात आली. याचवेळी उपसरपंच या पदावरही चर्चा करण्यात आली. अशोक भुवड व संदिप डाफळे या दोघांना अडीच अडीच वर्ष उपसरपंच पदावर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. परचुरी गावची ही ग्रा. पं. निवडणुक बिनविरोध होण्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अब्रार चोगले यांच्या नेतृत्चाखाली देवजी भुवड, रामचंद्र आरविलकर, गोविंद घाणेकर, युवराज कोळंबेकर, गणेश भुवड, कृष्णा महाडिक, फरिद चोगळे, शंकर गमरे, विलास गमरे, रामचंद्र डाफले, सुरेश सोलकर अशा सर्वांनी प्रयत्न केले. परचुरी ग्रा. पं. च्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. धायगुडे यांनी काम पाहिले. Parchuri Gram Panchayat unopposed