सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीची माहिती
गुहागर, ता. 14 : सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीमार्फत दाभोळ खाडीमध्ये पावसाळ्यामुळे बंद ठेवण्यात आलेली दाभोळ खाडीतील फरारे परचुरी फेरीबोट सेवा (दि. 14 ) आजपासून सुरु करण्यात येत आहे. Parchuri – Farare ferry boat service started


या फरारे परचुरी फेरीबोट सेवेचे उद्घाटन मे मध्ये करण्यात आले. त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने फेरीबोट सेवा बंद ठेवण्यात आली होती. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीने दाभोळ – धोपावे, जयगड – तवसाळ, वेश्वी – बागमांडले, आंबेत – मापरल, आगरदंडा – दिघी याठिकाणी फेरीबोट सेवा यशस्वीपणे सुरू आहेत. गुहागर तालुक्यातील प्रवाशांना परचुरे – फरारे – वाकवली – पिसई – मंडणगड – आंबेत – गोरेगाव या मार्गाने मुंबई कडे जाण्यासाठी प्रवास केल्यास वेळ व अंतर याची बचत होणार आहे. त्यामुळे परशुराम व कशेडी घाट यांच्यापासून त्रास कमी होईल. Parchuri – Farare ferry boat service started


तसेच वाकवली परिसरातील 50 गावातील प्रवाशांनाही रत्नागिरीकडे जाण्यासाठी फरारे – परचुरी – शृगांरतळी – आबलोली – रत्नागिरी या मार्गावरून प्रवास सुखाचा होणार आहे. हायवे व ट्रॅफिकचा त्रास होणार नाही. शिवाय पर्यटकांना गुहागर व दापोली तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांना भेटी देण्यास सोफे होणार असल्याची माहिती सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. योगेश मोकल यांनी दिली. Parchuri – Farare ferry boat service started