• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सीआयएसएफ जवानांची परेड व रक्तदान

by Manoj Bavdhankar
March 11, 2023
in Guhagar, Ratnagiri
100 1
0
Parade of CISF personnel and blood donation
196
SHARES
561
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्थापना दिनानिमित्त आरजीपीपीएलमध्ये कार्यक्रम

गुहागर, ता. 11 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमधील युनिटने परेड आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये सीआयएसएफ सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि गुप्तचर विभागाचे जवान व अधिकारी सहभागी झाले होते. Parade of CISF personnel and blood donation

Parade of CISF personnel and blood donation

10 मार्च हा दिवस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 54 व्या सीआएसएफ दिनानिमित्त आरजीपीपीएलमध्ये जवानांनी परेड केली. यावेळी आरजीपीपीएलचे एसओपी संजय अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर परेड कमांडर इन्स्पेक्टर अविनाश एस. सकळे यांनी संजय अग्रवाल यांना सलामी दिली. सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट पॉल के. वायफाय यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांनी स्थापना दिवसाच्या निमित्ताने पाठवलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. Parade of CISF personnel and blood donation

Parade of CISF personnel and blood donation

स्थापना दिनानिमित्त आरजीपीपीएलच्या सीआएसएफ युनिटमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात आरजीपीपीएलचे जॉन फिलिप, आशिष पांडे, सीआयएसएफचे सहाय्यक कमांडंट अकेश्वर सिंग यांच्यासह 20 जवानांनी रक्तदान केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रत्नागिरी या संस्थेने रक्तदान शिबिरासाठी साह्य केले. यावेळी अग्निशमन विभागाचे निरीक्षक कीर्ती कुमार, निरीक्षक/कार्यवाह नंदलाल चित्ते, गुप्तचर विभागाचे उप/कार्यवाह राहुल मिश्रा, अहिकार दीपक अहिकर, संभाजी रजित जाधव आणि पी कन्नन उपस्थित होते. Parade of CISF personnel and blood donation

Parade of CISF personnel and blood donation
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarParade of CISF personnel and blood donationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.