पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचा पुढाकार
गुहागर ता. 27 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेने विद्यार्थ्यांकडून रद्दी कागदांपासून कागदी पिशवी बनविण्याचा उपक्रम केला. या उपक्रमाला विद्यार्थ्याकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गणेशभक्तांनी भाविकांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करुन, जलप्रदुषण टाळण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळुन कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही त्यावेळी प्रशालेच्या वतीने करण्यात आले होते. Paper bags made by students

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतिष नलावडे, पदवीधर शिक्षिक शैलजा साळे, मंदार कानडे, जेष्ठ शिक्षिका अश्विनी धुमाळ, उपशिक्षक उमेश नाटेकर, बाबासाहेब राशिनकर, सुलक्षणा करडे, भारती गोवेकर, आकांक्षा खरे, पुजा ठाकुर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग व सदस्य यांची उपस्थिती होती. सदर उपक्रमासाठी आफ्रिकेतुन डॉ. स्वाती गाडगीळ यांचेही मार्गदर्शन लाभले. Paper bags made by students

