बदलत्या जिवनशैलीत पंचकर्म चिकित्सा का आवश्यक
डॉ.प्रदीप घाटे, रत्नागिरी [M.D.-AYURVED]
Guhagar news : पंचकर्म ही शरीरशुद्धीची (Body Detoxification )ची प्रक्रिया असून ही प्रक्रिया स्वस्थ व्यक्ती म्हणजे नॉर्मल माणूस तर करू शकतोच परंतु ज्यांना काही आजार (Disease)असेल त्यांनी ही चिकित्सा आवर्जून करावी. ज्या प्रमाणे गाडीचे सर्व्हिसिंग केले जाते त्याचप्रमाणे शरीरातील सर्व दोष, आम, नको असलेले घटक (Toxins ) बाहेर टाकून शरीराचे सर्व्हिसिंग ज्या प्रक्रियेमध्ये केले जाते, ती प्रक्रिया म्हणजे पंचकर्म चिकित्सा होय. Panchakarma therapy
पंचकर्म ही एक अशी चिकित्सा आहे कि, बाकी सर्व चिकित्सा एका बाजूला राहतात तर पंचकर्म चिकित्सा एका बाजूला राहते. ज्या ठिकाणी सर्व चिकित्सा संपतात त्या ठिकाणी पंचकर्म चिकित्सेचा आरंभ होतो. आजार किती ही जुनाट असला तरीही पंचकर्म चिकित्सेने रोगाचा समुळ नायनाट करण्याची शक्ती पंचकर्म खेरीज कोणत्याच चिकित्सेमध्ये नाही.
पंचकर्म चिकित्सा पद्धती चे पाच प्रकार पडतात
वमन
विरेचन
बस्ती
नस्य
रक्तमोक्षण
पंचकर्मक कोणी आणि का करावे?
👉 ज्यांना निरोगी राहायचे आहे त्यांनी पंचकर्म करावे.
👉 जे लोक जुनाट व्याधींनी त्रस्त आहेत आणि त्यामुळे बेड रिडन झाले असतील तर पंचकर्म चिकित्सा पद्धती अशा लोकांना वरदान ठरल्याशिवाय राहत नाही.👉 ज्यांची दिनचर्या चुकीची आहे.
👉 जे लोक वेळेवर जेवण घेऊ शकत नाहीत, वेळेवर झोपू शकत नाहीत त्यांनी पंचकर्म करावे.
👉 ज्या लोकांनी बरेच वर्ष जंकफुड, बेकरी पदार्थ, हॉटेलचे पदार्थ, चायनीज पदार्थ यांचा अतोनात शरीरावर मारा केला असेल त्यांनी वर्षातून एकदा तरी पंचकर्म करावे.
👉 ज्या लोकांनी बरेच वर्ष विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू यासारख्या शरीराला घातक असणाऱ्या पदार्थाचे बरेच वर्ष सेवन केले असेल तर होणाऱ्या लिव्हर, किडणी, हार्ट, मेंदू, फुफ्फुस यांचे आजार होऊ नये आणि झाले असल्यास ते घालवण्याची क्षमता पंचकर्मा खेरीज दुसऱ्या कोणत्याही चिकित्सा पद्धती मध्ये नाही. त्यामुळे अशा पेशंट नी पंचकर्म वर्षातून कमीत कमी एकदा तरी करावे.
👉 अशा अनेक चुकीच्या केल्या गेलेल्या आहार आणि विहार यामुळे शरीराची होणारी हानी थांबविण्यासाठी पंचकर्मासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही.
👉 ज्या लोकांना झोप लागत नाही मानसिक ताणतणाव असेल त्यांनी पंचकर्म करावे.
👉 ज्या लोकांनी पेन किलर, स्टिरॉइड किंवा अशा प्रकारच्या तत्सम गोळ्या बरेच वर्ष घेतल्या असतील त्यांनी वर्षातून एकदा तरी पंचकर्म करावे.
👉कोविड नंतर होणाऱ्या अनेक लक्षणांमध्ये पंचकर्म उपचार पध्दती अग्रेसर ठरली आहे. ज्या प्रमाणे 1) A.V.N 2) Dibetis 3) Blood pressure 4) Heart Disease 5) Skin Disease.
👉 उत्तम संतत्ती साठी गर्भधारणेपूर्वी पंचकर्म केले जाते. Panchakarma therapy
👉 वंध्यत्वामध्ये(Infertility) अनेक प्रकारच्या Test आणि Treatment करून सुद्धा यश येत नसेल त्या ठिकाणी पंचकर्म उपचार पध्दती ही वरदान ठरली आहे.
🔵 त्याच प्रमाणे खालील अनेक व्याधींमध्ये पंचकर्म चिकित्सा रोगाचा समुळ नायनाट करण्यासाठी वापरली जाते.
🔹 अनेक व्याधींमध्ये ऑपरेशन टाळणे पंचकर्म मुळे सहज शक्य होते. Replacement ऐवजी Regeneration
🔹आमवात, संधीवात,गाऊट, मणक्यांचे विकार, चकती सरकणे, नस दबणे.
🔹 Paralysis, Obesity, Thyroid
🔹 त्वचा विकार, मूळव्याध, अम्लपित्त, पोटांचे विकार, केसांचे विकार, मुतखडा , उदर(Asitis) अशा अनेक जुनाट व्याधींवर पंचकर्म चिकित्सा उत्तम कार्य करते.
या पुढे आपण प्रत्येक पंचकर्म विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अधिक माहितीसाठी डॉ.प्रदीप घाटे, रत्नागिरी [M.D.-AYURVED] फोन नं. 8275392430, 7972960979 यावर संपर्क साधावा.