• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंत्ययात्रेचे भजन म्हणत ग्रामस्थांनी केले आंदोलन

by Ganesh Dhanawade
January 3, 2023
in Guhagar
249 3
0
Palshet villagers protest at Guhagar
489
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे

गुहागर, ता. 03 : राम राम राम.., सीताराम सीताराम…., आम्ही जातो आमच्या गावा..आमचा राम राम घ्यावा…अशाप्रकारे टाळ मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रेचे भजन म्हणत तालुक्यातील पालशेत ग्रामस्थांनी गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.  काळेवठार शाळेच्या शौचालय दुरुस्तीच्या कामातील घोटाळ्याबाबत हे आंदोलन करण्यात आले होते. भर बाजारपेठेत सुरू असलेल्या पालशेत ग्रामस्थांच्या आगळ्यावेगळ्या उपोषणाकडे नागरीकांचे लक्ष वेधले जात होते. अखेर दुपारी गटविकास अधिकारी यांच्या लेखी कारवाईच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. Palshet villagers protest at Guhagar

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

पालशेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून काळे वठार शाळेच्या शौचालय दुरुस्तीसाठी एक लाख 52 हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतू काम पूर्ण होण्या अगोदरच या शौचालयावर काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आले होते. सदर बाब निदर्शनात येतात रात्रीच्या वेळी मोबाईलच्या बॅटरीवर अतिशय निकृष्ट पद्धतीचे काम करण्यात आले आहे.  सदर कामांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य मिनार पाटील व ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी यांच्याकडे सदर कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व यामध्ये असलेले अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, गटविकास अधिकारी यांनी याबाबत विलंब लावला. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करताना तक्रारदार यांना घटनास्थळी न बोलता परस्पर पाहणी करून सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही केला आहे. Palshet villagers protest at Guhagar

Palshet villagers protest at Guhagar

दरम्यान, यावर जिल्हास्तरावरून चौकशी होऊन या घोटाळ्यामध्ये असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणातून केली आहे. पालशेत ग्रामपंचायत सदस्य मिनार पाटील उपसरपंच महेश वेल्हाळ यांच्यासहित माजी उप सरपंच रवींद्र कानिटकर, माजी ग्रा. पं.सदस दत्तराज पाटील, माजी ग्रा. पं. सदस्य महेश तोडणकर, नरेंद्र नार्वेकर, यशवंत पालकर, विजय नागवेकर, अजय नागवेकर, सीताराम पटेकर, अजय चव्हाण, चंद्रहास चव्हाण, गजानन पालकर, रमेश साळवी,मारुती झिंबर, रवी पालशेतकर, विनायक गुहागरकर, सर्वेश गुहागरकर आदी उपोषणाला बसले होते. Palshet villagers protest at Guhagar

यावेळी या उपोषणकर्त्याना भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, सचिन ओक, बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष दिपक कनगुटकर, नगरसेवक अमोल गोयथळे, रोहन भोसले अशा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. तसेच त्यांनी गटविकास अधिकारी व अन्य अधिकारी यांना जाब विचारला. Palshet villagers protest at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPalshet villagers protest at GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share196SendTweet122
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.