गुहागर, ता. 12 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघटनेमार्फत तालुकास्तरीय लोकनृत्य आणि राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा नूकत्याच पार पडल्या. या दोन्ही गटांमध्ये श्रीमती.आर.पी.पी. पालशेत विद्यालयाने ‘प्रथम क्रमांक’ पटकावून घवघवीत यश संपादीत केले. Palshet School’s success in various competitions
या राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयातील कु. चिन्मयी केळकर, कु. स्वर्णी गोयथळे, कु.आदिती ठोंबरे, कु.सिद्धी आग्रे, कु.वैष्णवी रायकर, कु. शुभम रामाणे, कु.निधी हळये, कु. श्रेयस तुपट, कु. प्रफुल्ल जोशी हे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर लोकनृत्य स्पर्धेमध्ये कु. अंतरा पालशेतकर, कु.जान्हवी बेंदरकर, कु. शौर्या पालशेतकर, कु. अक्षरा दाभोळकर, कु.श्लेषा ढोर्लेकर, कु. प्रांजली जाक्कर, श्लोका होडेकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. Palshet School’s success in various competitions
वरील सर्व विद्यार्थांना विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. केळस्कर स्वरूप तसेच स्थानिक कलाकार श्री. दैवत जाक्कर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. जोगळेकर, पर्यवेक्षिका सौ. ढेरे मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी प्रशालेच्या या तालुकास्तरीय घवघवीत यशाबदद्ल विधार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व कौतूक केले. Palshet School’s success in various competitions