• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेतर्फे सा. बां. उपविभाग गुहागर यांना निवेदन

by Ganesh Dhanawade
August 22, 2023
in Guhagar
112 1
1
Palshet Pomendi Road Dilapidation

निवेदन देताना कोंडकारुळ विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, सचिव श्रीराम विचारे, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर.

220
SHARES
629
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालशेत पोमेंडी फाटा ते मारुती मंदीर रस्त्याची दुरावस्थेबाबत

गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील पालशेत पोमेडीफाटा ते मारुती मंदीर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांनी निवेदाद्वारे सार्वजनिक बांधकाम उप विभाग यांना दिला आहे. Palshet Pomendi Road Dilapidation

मोडका आगर ते तवसाळ रस्ता सा.बां. उपविभागाकडे आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती संद्‌र्भात मागील १७ जूलै रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु, याची दखल घेतली गेली नाही. या मार्गावरून सतत पर्यटकांची ये – जा सुरु असते. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. येत्या सात दिवसात रस्त्याची दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा या निवेदाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन देण्यासाठी कोंडकारुळ विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, सचिव श्रीराम विचारे, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर आदी उपस्थित होते. Palshet Pomendi Road Dilapidation

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMNSNews in GuhagarPalshet Pomendi Road DilapidationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.