• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालपेणे प्रीमियर लीगचे पर्व २ रे उत्साहात संपन्न

by Ganesh Dhanawade
February 1, 2023
in Sports
115 1
0
Palpene Premier League 2023 concluded

पालपेणे येथे श्री वरदान देवी प्रिमियर लिग

226
SHARES
647
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पालपेणे येथे श्री वरदान देवी प्रिमियर लिग श्री खेम वरदान देवीच्या कृपाशिर्वादाने पार पडल्या. यासाठी सहकार्य करणा-या ग्रामस्थांचे, क्रीडाप्रेमींचे, संघमालक व खेळाडूंचे मनापासून आभार मानण्यात आले. श्री खेम वरदान देवी पुरस्कृत पालपेणे प्रिमियर लीग २०२३ पर्व २ रे याचे खास आकर्षण म्हणजे गावातील सर्व मंडळे, ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी व खेळाडू यांच्या सहकार्यातून ग्रामदेवतेच्या नावाने बनविलेला सव्वा किलो चांदीचा फिरता चषक ठरला होता. Palpene Premier League 2023 concluded

ही स्पर्धा व चांदीचा चषक म्हणजे ग्रामदेवतेचे मांगल्य, पावित्र्य, देवीचा मान-सन्मान, तीचा आशिर्वाद व पालपेणे गावातील सर्व ग्रामस्थांचे एकतेचे व गावच्या अस्मीतेचे प्रतिक आहे. पालपेणे गावासाठी ही स्पर्धा नसून ग्रामदेवतेच्या नावाचा एक क्रीडा सोहळा आहे. यावर्षीच्या क्रीडा सोहळ्याचे उदघाटन डॉ. राजेंद्र पवार व दादू गुहागरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. श्री खेम वरदान देवी पुरस्कृत पालपेणे प्रिमियर लीग सुरु करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे किमान वर्षातील दोन दिवस तरी गावातील तरुण मुलांनी ग्रामस्थानी एकत्र यावे. एकमेकांशी सुसंवाद साधावा व त्यातून गावाची एकता साधून गावच्या सामाजीक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतीक इत्यादि सर्वच क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा विकास साधावा. यावर्षीचा चषक श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावे ठेवण्यात आले होते. प्रत्येक वर्षी वेगवेगळया सत्पुरुषांच्या नावे चषक ठेवून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणी व स्मृती तरुणांमध्ये जागृत करून ठेवण्याचे काम या लीगचे माध्यमातून करण्यात येत आहे. Palpene Premier League 2023 concluded

यावर्षी याच लीगचे माध्यमातून गावातील सर्व महिलांसाठी हळदिकुंकू समारंभ आयोजीत करण्यात आला होता. तसेच तालुक्यातील सर्वच समाजातील अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रामचंद्र हुमणे (कुणबी समाज), डॉ. प्रकाश शिर्के व भगवानशेठ कदम (मराठा समाज), विनायक काताळकर (लोहार समाज), प्रकाश झगडे (तेली समाज) अरविंद पालकर (कुंभार समाज) साबीरभाई साल्हे (मुस्लीम समाज), प्रशांत शिरगावकर व भाई बेलवलकर (वैश्यवाणी समाज), सुभाष रजपूत (गोसावी समाज), विजय जानवळकर (चर्मकार समाज), सुनिल जाधव (बौध्दजन संघ) , धामणस्कर (सुतार समाज) या समाज अध्यक्षांनी भेट दिली. सदरची स्पर्धा ही लाखाची नसून ती आमच्या जीवा भावाची आहे हे पालपेणे ग्रामस्थांनी आपल्या सहकार्यातून व उपस्थितीने दाखवून दिले. Palpene Premier League 2023 concluded

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या क्रीडा सोहळ्याला अनेक मान्यवरांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या त्यामध्ये रामदास राणे, सुरेश सांवत, नगराध्यक्ष राजेश बेडल , प्रदिप बेंडल, नाना वराडकर, मुन्ना जैतपाल, गौरव वेल्हाळ, कोकण कार्टी फेम प्रीतेश रहाटे, पाटपन्हाळे गावचे पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, बीट अंमलदार शिवलकर, अजय खाडे, ओकार संसारे, शोएब मालाणी, संदिप मांडवकर, अजित बेलवलकर, सचिन म्हसकर (सरपंच त्रिशुल साखरी,) जान्हवी शिरगावकर( सरपंच जानवळे), पाटपन्हाळे गावचे सरपंच विजय तेलगडे व उपसरपंच आसिम साहे, संतोष सोलकर (अध्यक्ष कुणबी पीमीयर लीग), दादू गुहागरकर, पालपेणे गावच्या सरपंच योगीता पालकर, उपसरपंच रघुनाथ घाणेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, संजय पालकर( तंटामुक्ती अध्यक्ष), गावातील सर्व मंडळांचे अध्यक्ष यांनी उपस्थिती दाखविली. Palpene Premier League 2023 concluded

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPalpene Premier League 2023 concludedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet57
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.