ग्रामदेवतेच्या देवळातून चांदिच्या चषकाची बैलगाडीतून मिरवणूक
गुहागर ता. 13 : पालपेणे गावची ग्रामदेवता श्री खेम वरदान देवीच्या कृपाशिर्वादाने आणि पालपेणे गावातील सर्व लहानथोर ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली ३ वर्ष पालपेणे प्रिमीयर लीगचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. ०५ व दि. ०६ जानेवारी २०२५ या दोन दिवशी पालपेणे प्रिमीयर लीग २०२५ पर्व ४ चे यशस्वी आयोजन कै. मोतीराम गुहागरकर मैदान पालपेणे मधलीवाडी येथे पार पडली. Palpene Premier League
ग्रामदेवतेच्या नावाने कायमस्वरुपी चांदीचा फिरता चषक हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आणि वैशिष्ठय आहे. तसेच दरवर्षी एखाद्या नामवंत व्यक्तीच्या नावाने स्पर्धेचा चषक भरविला जातो. त्याप्रमाणे यावर्षी राजमाता जिजाऊ यांचे नावे चषक भरविण्यात आला होता. या स्पर्धेचा मुळ हेतू गावातील तरुणांना एकत्र करुन त्यांच्यामध्ये सुसंवाद साधून भविष्यकालीन गावच्या विकासासाठी एक सुसंघटीतपणा तयार करणे व युवकांना गावच्या विकासात्मक चळवलीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे. एकत्रीतपणे सहभागी होऊन ती कामे यशस्वी करणे. हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. Palpene Premier League
या स्पर्धेसाठी एकूण १२ संघ तीन गटात खेळविण्यात आले होते. १२ संघात एकूण १४४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा विजेता संघ श्री राम समर्थ इलेव्हन व उपविजेता दोस्ती क्रीकेट संघ, ठरला. विजयी संघाचे मनापासून आभार मानण्यात आले. मालीकावीर सुमित टाणकर, उत्कृष्ठ गोलंदाज श्री. समिर खांडेकर व उत्कृष्ठ फलंदाज तेजस पालकर ठरला. Palpene Premier League
भारत हा देश शेतीप्रधान आहे. गोधनाला, शेतीला व शेतक-याला अनन्यासाधारण महत्व आहे. शेतकरी आहे म्हणून आपणा सर्वांना पोटभर अन्न मिळत आहे. त्याची जाणीव ठेवून यावर्षी ग्रामदेवतेच्या देवळातून चांदिचा चषकाची चक्क बैलगाडीतून मिरवणूक काढून तो चषक मैदानावरती आणण्यात आला. यावर्षी राजमाता जिजाऊ यांचे नावे चषक असल्याने व स्पर्धेसाठी ज्या माऊलीचा मोठा सहभाग मिळतो. अशा श्रीमती गीताताई गंगाराम नवरत यांचे हस्ते स्पर्धेचे उदघाटन करणेत आले. मा.सरपंच महोदया सौ. योगीता पालकर यांचे हस्ते क्रीडांगणाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्री दिलीप पाष्टे, वरदान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हासबेसर, श्री. अरविंद संसारे, माजी उपसरपंच श्री. रघुनाथ घाणेकर, रविंद्र घाणेकर, ग्रामदेवतेचे मानकरी श्री. शैलेश घाणेकर व श्री. शिवराम मांडवकर तसेच पालपेणे गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते. Palpene Premier League
या स्पर्धेमध्ये महिला वर्गाचा सुध्दा मोठा सहभाग असतो, लीगच्या वतीने त्यांचेसाठी सोमवार दिनांक ०६ जानेवारी २०२५ रोजी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ६०० महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला, महिलांसाठी श्री. विनोद घाणेकर यांचे कडून पाच पैठणींचे लकी ड्रॉ चे माध्यमातून वाटप करण्यात आले, तसेच उमेश खैर आणि परिवाराचे वतीने ६० वर्षावरील पाच जेष्ठ महिलांसाठी प्रत्येकी ५ लीटर गोडेतेलाचा डबा व ६० वर्षावरील पाच जेष्ठ पुरुषांसाठी पाच भेटवस्तू प्रदान करून स्पर्धेचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करणेत आला. Palpene Premier League
यावर्षी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यामध्ये विद्यमान आमदार व माजी मंत्री श्री. भास्करशेठ जाधव, शिवसेना व कुणबी समाज नेते श्री. राजूदादा बेंडल, माजी जि.प. अध्यक्ष श्री. विक्रांतजी जाधव, भाजप तालुकाध्यक्ष श्री. निलेशजी सुर्वे, माजी सभापती श्री. सुरेशदादा सावंत, गुहागर तालुका संरपंच संघटनेचे अध्यक्ष व खामशेत गावचे सरपंच श्री मंगेशजी सोतकर, परागजी कांबळे, पाटपन्हाळे गावचे उपसरपंच श्री. आसीम साल्हे, गुहागर तालुका कुंभार समाज अध्यक्ष श्री अरविंद पालकर, श्री. नाना पालकर आणि सहकारी, कुणबी प्रीमियर लीग व गुहागर तालुका कुणबी युवा अध्यक्ष श्री. मंगेशजी मते, श्री. संतोषजी सोलकर आणि सहकारी, श्री. दादूशेठ व भावेशशेठ गुहागरकर, गफारशेठ मेमण, सत्यप्रकाश चव्हाण, पत्रकार घाणसेपाटील, पत्रकार दिनेशजी चव्हाण, उमेश शिंदे, गणेश किर्वे, गमरे व नांदगावकर गुरुजी, जनसेवा एज्युकेशन सोयसायटीचे अध्यक्ष श्री. गणपतशेठ खैर या मान्यवरांनी भेट दिल्या. या लीगसाठी मुंबईस्थीत श्री. संदिपदादा खैर यांचेही मोलाचे योगदान लाभले. Palpene Premier League
विशेष म्हणजे या लीग स्पर्धेसाठी डी. वाय.एस.पी. आदरणीय राजमाने साहेब यांनी भेट देवून व प्रत्यक्ष मैदानावर क्रीकेट खेळून खेळाडूंना व स्पर्धेला शुभेच्छा दिल्या हे स्पर्धेचे मोठे वैशिष्ठय मानावे लागेल. पालपेणे प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष श्री सुधीर भाऊ टाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्ष या स्पर्धेसाठी ज्यांचे मोलाचे योगदान लाभले ते म्हणजे लीगचे विद्यमान अध्यक्ष श्री. उमेशदादा खैर यांचा मोलाचा वाटा आहे. श्री. वैभव आदवडे, कमलाकर आदवडे, वैभव पडवेकर, विनायक घाणेकर, विवेक नवरत, सुमित टाणकर, अमित खांडेकर, रघुनाथ घाणेरकर, दिपकजी साटम, शैलेश महाडीक, नितीन महाडीक, सिध्देश महाडीक, परेश कदम, सौरभ घाणेकर, साहिल महाडीक, किरण आयरे, विराज मांडवकर, विकास मांडवकर, तेजस ठाणकर, बिपिन घाणेकर, मयूर चव्हाण, सुधाकर आदवडे, बिपिन घाणेकर, सुदेश चांदिवडे, संग्राम मांडवकर, चंद्रदिप कुंभार, निलेश टाणकर या खेळाडूंनी व अनेक ग्रामस्थांनी ही स्पर्धा पार पाडणेसाठी काम केले, गावातील व पंचक्रोशतील अनेक मान्यवरांनी, ग्रामस्थांनी बंधू भगिनी यांनी श्रमीक, आर्थिक सहकार्य करुन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. शेवटी विद्यमान अध्यक्ष श्री. उमेश खैर यांनी सर्वांचे आभार मानले व स्पर्धेचा समारोप झाला. Palpene Premier League