• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत रंगला पालखी भेटीचा सोहळा

by Guhagar News
April 1, 2024
in Guhagar
63 1
0
Palkhi ceremony at Abloli
124
SHARES
354
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी, तीन्हीं बहिणींची गळाभेट

गुहागर, ता. 01 : कोकण आणि शिमगोत्सव याचं अनोखं नात तालुक्यातील आबलोली येथे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी यांच्या पालखी भेटीचा, तीन्हीं बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. फटाक्या़ंची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात रंगलेला पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. Palkhi ceremony at Abloli

Palkhi ceremony at Abloli

नवलाईदेवीची गळाभेट होताना दोन्हीं पालखींच्या आतील नारळांची आपोआप अदला बदल होते, अशी अख्यायिका सांगण्यात येते. आबलोली पागडेवाडी येथील मानकरी नऊ दिवस देवीच्या नावाने श्रध्दापूर्वक कडक उपवास करतात. तसेच रमेश पांडुरंग गोणबरे, सुरेश गोविंद गोणबरे, शंकर तानू गोणबरे, दिलीप रामचंद्र गोणबरे, रमेश गोविंद गोणबरे, दिनेश दशरथ गोणबरे, राजेश दत्ताराम गोणबरे, प्रमोद रामचंद्र गोणबरे हे सहाणेवर नवलाईदेवीच्या पालखी समोर नतमस्तक होऊन धारदार शस्त्राने स्वतःच्या अंगावर मारतात. मात्र, यावेळी कसल्याही प्रकारची इजा होत नाही,  साधे खरचटतही नाही किंवा रक्तही येत नाही. एकुणच हा पालखीभेट, गळाभेट सोहळा भक्तांसाठी, भावीकांसाठी पर्वणीच असते. Palkhi ceremony at Abloli

फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर आबलोली – खोडदे येथील होम पेटवीले जातात. दुपारनंतर आबलोली येथील श्री नवलाईदेवी, खोडदे गणेशवाडी येथील श्री नवलाईदेवी, खोडदे सहाणेचीवाडी येथील श्री नवलाईदेवी या तिन्हीं पालख्या तिन्हीं बहिणी आपल्या लाडक्या भावाला गोपाळजीला भेटून आल्यानंतरच आबलोली येथील होळीच्या मैदानावर नाचवीण्यात येतात. याचवेळी दुपारनंतर सहाणेवर जत्राही भरते. विशेष म्हणजे आबलोली येथील श्री नवलाईदेवीच्या पालखीला खोडदे येथील श्री नवलाईदेवीच्या पालख्या क्रमाक्रमाने भेटतात. या बहिणी गळाभेट घेताना या देवतांमध्ये बहिणींच नातं असल्याने ग्रामस्थ आवर्जुन सांगतात. यावेळी दोन्हीं गावातील लोक आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेणा-या भक्तांना उचलून घेतात आणि गावातील ग्रामस्थांच्या खांद्यावर उभे असलेल्या ग्रामस्थांच्या खांद्यावरील पालख्या वाजत – गाजत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिष बाजीत एकमेकांची गळाभेट करतात. Palkhi ceremony at Abloli

आबलोली – खोडदे पालख्यांची, श्री नवलाईदेवीच्या बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजुस ग्रामस्थ नाचवीत असतात. पहिली पालखी भेटून निघुन गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदैवतेला भेटते. अतिशय शिस्तबध्द उत्साहात हा सोहळा पार पडतो. आबलोलीतील होळीच्या मैदानावर रंगणारा हा पालखीभेट, गळाभेट सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे. Palkhi ceremony at Abloli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPalkhi ceremony at AbloliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.