भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार
गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने यादव यांना आजीवन कारवासाची शिक्षा सुनावली होती. भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीमुळे पाकिस्तान सरकारने त्यांची सुटका केली. 31 आँगस्टला ते भारतात (अहमदाबाद, गुजराथ) परतले. Pakistan government released Yadav


अहमदाबादमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना कुलदिप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच आजही पाकिस्तानी कैदेत नरक यातना भोगणार्या चार पाच महिलांसह 28 भारतीय कैद्यांची लवकरच लवकर सुटका करावी. अशी मागणी त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. Pakistan government released Yadav
कुलदिप कुमार यादव यांचा जन्म डेहराडूनला झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर त्यांचा परिवार अहमदाबादला स्थायिक झाला. अहमदाबाद येथून त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधात असताना 1992 मध्ये त्यांना दोन वर्षांसाठी पाकिस्तान मध्ये एक जाँब मिळाला. ही नोकरी स्विकारुन ते पाकिस्तानात गेले. आपली नोकरी संपवून भारतात परतत असताना पाकिस्तानी एजन्सीने हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना 1994 मध्ये अटक केली. तेथे कैदेत असताना नरक यातनांपेक्षाही अधिक यातना त्यांनी भोगल्या. Pakistan government released Yadav


कुलदिप यादव पाकीस्तानच्या कैदैत असल्यांची माहिती त्यांच्या कुटुंबाला तब्बल तिन वर्षांनी समजली. तेव्हापासून त्यांची बहिणीने विवाह केला नाही. 31 आँगस्टला 59 वर्षीय कुलदिप यादव अहमदाबादला परतले. Pakistan government released Yadav