निर्मल सीडस् व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्राचे आयोजन
गुहागर, ता. 19 : निर्मल सीडस् प्रा. लि. पाचोरा व श्री. समर्थ कृषी सेवा केंद्र शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने भात पीक प्रात्यक्षिक पहाणी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तळवली गावातील श्री. मनोहर आग्रे यांच्या शेतात निर्मल संकरीत भात NPH-30 या वाणाचा भात पीक पहाणी करण्यात आली. हा कार्यक्रम दि. 12/10/2022 रोजी सकाळी 11 वा. आग्रे यांच्या शेतात पार पडला. कार्यक्रमासाठी बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते. Paddy crop inspection at Talwali

सदर कार्यक्रमात श्री. पाटील यांनी बहूमोल मार्गदर्शन केले. श्री. पिसाळ सर यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना कोणत्या आहेत. त्या कशा प्रकारे सादर करायच्या या संदर्भात मार्गदर्शन केले. श्री. शिंदे सर यांनी भात पिक लावल्यानंतर शेताची कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. Paddy crop inspection at Talwali

सदर कार्यक्रमास निर्मल सीडस् कंपनीचे विभाग प्रमुख संतोष पाटील, कोल्हापूर सतिश शिंदे, रत्नागिरी. कृषी केंद्रिय मालक समीर वझे, कृषी अधिकारी श्री. पिसाळ, श्री. अमित शेळके तळवली गावचे पोलिस पाटील श्री. पवार, दत्ताराम आग्रे आदी शेतकरी उपस्थित होते. Paddy crop inspection at Talwali

