खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) “आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, रांगोळीस्पर्धा, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीतगायन, भित्तीपत्रक, “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास” यावर आधारित ग्रंथप्रदर्शन, इत्यादी विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.इतिहास विभागातर्फे “भारतीय स्वातंत्र्यराश्राश्मी चळवळीचा इतिहास” यावर प्रा.सौ. रश्मी आडेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल सावंत उपस्थित होते. Organizing various competitions in KDB college


प्रास्ताविकामध्ये प्रा.विराज महाजन यांनी “भारतीय स्वातंत्र चळवळीचा इतिहास” हा सर्वाना ज्ञात असला पाहिजे. भारतीय राजकारण शिकताना इतिहास अभ्यासल्याशिवाय योग्य अर्थबोध होत नाही, असे मत व्यक्त केले. त्यांनी महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या काळाशी सुसंगत असे स्विकारावे. हे स्पष्ट करून त्यांनी महात्मा गांधीच्या स्वच्छतेचे महत्त्व आजच्या भारताशी कसे जोडले गेले आहे हे सांगितले. Organizing various competitions in KDB college


महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल सावंत यांनी इतिहासातील व्यक्तींचे विविध दाखले देवून त्यातील चांगल्या गुणांचा आपण स्विकार करावा, हे विशद केले. जसा आपल्याला मागील पिढीने वारसा दिला. तशाच पद्धतीने आपल्याला पुढच्या पिढीला “शाश्वत पर्यावरण, स्वातंत्र चळवळीत विविध समाज सुधारकांचे, नेत्यांचे, क्रांतीकारंकाचा वारसा” आपण जपला पाहिजे. त्याचबरोबर तो योग्य अशा पुढील पिढीकडे सोपविण्याचे आवाहन केले. देश हा व्यक्तींनी मोठा होत असतो. महाविद्यालयातील तरुणांनी भारताच्या उज्ज्वल भवित्यासाठी कटीबद्ध असण्याची जाणीव करून दिली. Organizing various competitions in KDB college
भारतीय स्वातंत्र चळवळीचा इतिहास विशद करताना प्रा.सौ.आडेकर यांनी चित्रफितच्या सहाय्याने प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा आढावा घेतला. युरोपियनांचे आगमन, सन १८५७ च्या बंडाचे महत्त्व, त्यातून आधुनिकतेचा सुरु झालेला प्रवास, सामाजिक-धार्मिक जागृती, राष्ट्रीय सभेची स्थापना, इत्यादी विविध घटनांमधून इतिहास उलगडत नेला. राष्ट्रीय चळवळीचे मवाळ, जहाल, क्रांतिकारी राष्ट्रवादी गांधीजींच्या चळवळीचे महत्त्व सांगितले. यानंतर सन १९३५ चा कायदा क्रिप्समिशन,त्रिमंत्री योजना व माऊंटबॅटन प्लॅन या घटनात्मक तरतुदी स्पष्ट करून दि. १५ ऑगस्ट, १९४७ चा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगितला. Organizing various competitions in KDB college


समारोपाकडे वळताना भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षाचा इतिहास आहे. तो जपून ठेवने व प्रत्येक व्यक्तीमध्ये देशाबद्दल असणाऱ्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे आणि ती कृतीतून दिसून आली पाहिजे. तरच “हर घर तिरंगा”उपक्रम सफल होईल असे सांगितले. आभार प्रदर्शन करताना प्रा.डॉ.आनंद कांबळे यांनी भारतीय स्वातंत्र चळवळीचा इतिहास हा स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतंत्र विषय असल्याचे स्पष्ट केला. कला शाखेतील विद्यार्थांनी या संधीचा फायदा घेऊन यश संपादन करावे. ही आशा व्यक्त केली. या कार्यक्रमास प्रा.विराज महाजन आणि बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. Organizing various competitions in KDB college