• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीत मराठा प्रिमीयर लीगचे आयोजन

by Ganesh Dhanawade
March 21, 2023
in Guhagar
91 1
0
Organizing Maratha Premier League at Sringaratali
179
SHARES
510
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

२४ मार्च 2023 रोजी; कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांची उपस्थिती

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर तर्फे मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा शृंगारतळीतील जानवळे फाटा येथील (गोल्डन व्ह्यू मैदानावर )२४ मार्च ते 26 मार्च अशी तीन दिवस खेळवल्या जाणार आहेत. या स्पर्धांसाठी मराठा समाजाचे अनेक दिग्गज नेते, सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याची माहिती गुहागर तालुका क्षेत्रीय मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अँड. संकेत साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. Organizing Maratha Premier League at Sringaratali

Organizing Maratha Premier League at Sringaratali

या स्पर्धेमध्ये २० संघ मालक सहभागी होणार असून सुमारे साडेतीनशे खेळाडू आपल्या खेळाचा थरार दाखविणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ५५ हजार ५५५/-द्वितीय पारितोषिक ३३ हजार ३३३/-, तृतीय पारितोषिक ११ हजार/-, चतुर्थ पारितोषिक ७ हजार व प्रत्येकी चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत वैयक्तिक बक्षीसही ठेवण्यात आली आहेत. Organizing Maratha Premier League at Sringaratali

या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे मराठा समाजातील दिग्गज नेते कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे, केशवराव भोसले, आमदार भास्कर जाधव, जिल्ह्यातील सर्व मराठा आमदार, पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य क्रिकेट उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील सर्व समाजाचे अध्यक्ष, तसेच गुहागर तालुक्यातील इतर समाजातील उत्कृष्ट खेळाडू यांचा गौरव करण्यात येणार आहे. Organizing Maratha Premier League at Sringaratali

Organizing Maratha Premier League at Sringaratali

क्षत्रिय ज्ञाती मराठा संघटना, गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर ही मराठा समाजाच्या सर्व गावातील तरुणांना एकत्र करणे व क्षत्रिय मराठा भवन उभारणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मराठा प्रिमियर लीगचे पहिल्यांदाच आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील अशा स्वरुपाची ही पहिलीच स्पर्धा आहे. मराठा प्रिमियर लीग ही केवळ क्रिकेटची स्पर्धा नसून मराठ्यांचा महामेळा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील सर्वदूर पसरलेल्या मराठा समाज बांधवांना एकाच छताखाली आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अँड. संकेत साळवी यांनी सांगितले. Organizing Maratha Premier League at Sringaratali

तसेच स्पर्धा ही मराठा समाज्याची नसुन सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतर समाजातील दिग्गज व्यक्तींचा तसेच इतर समाजातील कर्तबगार व मोठ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान यानिमित्ताने मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेमधून जो निधी जमा होणार आहे आणि समाजातील दानशूर व्यक्तीकडून बक्षीस रूपात जो निधी संकलन होईल तो सर्व निधी हा मराठा भवन बांधण्यासाठी खर्च केला जाणार आहे. Organizing Maratha Premier League at Sringaratali

या पत्रकार परिषदेला क्षेत्रीय मराठा समाजाचे सचिव अमिश कदम, युवा संघटनेचे सचिव निखिल साळवी, उपाध्यक्ष शैलेश पवार, उपाध्यक्ष नंदकुमार खेतले, रोहित विचारे, दिनेश कदम, सुयोग विचारे, सागर देसाई, जय शिर्के, कुणाल देसाई, निमेश मोरे आधी युवा प्रतिनिधी उपस्थित होते. Organizing Maratha Premier League at Sringaratali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOrganizing Maratha Premier League at SringarataliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.