शृंगारतळी रिगल कॉलेजमध्ये दि. १२ रोजी हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रकल्पाअंतर्गत
गुहागर, ता. 28 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेज मध्ये दि. १२ जानेवारी २०२४ रोजी गुहागर तालुक्यामध्ये प्रथमच तृतीय वर्ष, हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रकल्पाअंतर्गत शामसागरी थीम डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध कोळीनृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण रिगल कॉलेज, शृंगारतळीचे विद्यार्थी करणार आहेत. Organized Shamsagri theme dinner


तालुक्यातील खवय्यांसाठी हे खास आकर्षण ठरणार आहे. या थीम डिनर अंतर्गत चिकन कोळीवाडा, चणा कोळीवाडा, सुरमई फ्राय, फिश करी अशा १५ ते २० प्रकारच्या शाकाहारी व मांसाहारी कोळी डिशेसचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. याअंतर्गत विविध स्टार्टर्स व स्वीट डिशेसचा देखील समावेश आहे. या थीम डिनरची वेळ सायंकाळी ७ ते ११ अशी असून प्रवेश शुल्क रु. ३५०/- आहे. या कार्यक्रमाच्या तिकिट बुकिंगला खवय्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. Organized Shamsagri theme dinner
कोकण समुद्रकिनाऱ्यावर कोळी समाज बहुसंख्य प्रमाणात आढळून येतो. या संस्कृतीची ओळख प्रेक्षकांना व्हावी हा या थीम डिनरच्या आयोजन मागचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी ७०६६०३४२०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी केले आहे. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजय शिर्के व संचालिका डॉ. सौ. सुमिता शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Organized Shamsagri theme dinner