• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपा तर्फे संगीत भजन स्पर्धेचे आयोजन

by Ganesh Dhanawade
June 29, 2023
in Guhagar
111 1
0
Organized music bhajan competition by BJP
218
SHARES
622
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी, गुहागर विधानसभा आयोजित भव्य दिव्य संगीत भजन स्पर्धा दिनांक ८ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा पालशेत येथील श्री. दत्त मंदिर सभागृहात माजी आमदार डॉ.विनयजी नातू यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. Organized music bhajan competition by BJP

या संगीत भजन स्पर्धेतील प्रथम विजेत्या भजन मंडळाला  रोख रक्कम २५ हजार रुपये व  सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेत्या भजन मंडळाला रोख रक्कम १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक विजेत्या भजन मंडळास रोख रक्कम १० हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी भजन मंडळाला सहभाग सन्मानचिन्ह व प्रोत्साहन पर रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच  उत्कृष्ट गायक, पखवाज, चकवा, तबला, कोरस यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. Organized music bhajan competition by BJP

या स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित करण्यासाठी व  अधिक माहितीसाठी दि. ३ जुलै २०२३ पर्यंत सचिन मुकुंद ओक मो. ९४२११८७४९७, संगम मोरे ७८७५८३०९१४, ८६००८७४३४४ यांच्या कडे संपर्क साधावा. स्पर्धेचे नियम व अटी तसेच या संगीत भजन स्पर्धेत जास्तीत जास्त संगीत भजनी मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, गुहागर विधानसभा चिपळूण अध्यक्ष अजित थरवळ यांनी प्रशिध्दी पत्रकाव्दारे  केले आहे. Organized music bhajan competition by BJP

Tags: BJPGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOrganized music bhajan competition by BJPUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभाजपामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet55
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.