एक्स्पोत राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी, उद्योजकांचा सहभाग
मुंबई, ता.17 : राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) चे आयोजन केले आहे. मुंबईत सकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मायटेक्स एक्स्पोचा शानदार भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. Organized Maharashtra International Trade Expo

महाराष्ट्र शासन उद्योग विभाग, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्य संस्थाच्या वतीने हा भव्य एक्स्पो संपन्न होत आहे. ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. या मायटेक्समध्ये जगभरातील व्यापारी आणि उद्योजकांचा सहभाग असल्याने उद्योग, व्यापार क्षेत्रासाठी मांदियाळीच ठरणार आहे. Organized Maharashtra International Trade Expo
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत थेट संवाद साधण्याची संधी सहभागी होणाऱ्या उद्योजक, व्यापारी बंधूना मिळणार आहे. सकाळी आठ ते नऊ या कालावधीत मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या समवेत संवाद साधता येणार आहे. त्यानंतर `मायटेक्स एक्स्पो`चा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. Organized Maharashtra International Trade Expo
भव्य असलेल्या या एक्स्पोमध्ये आर्टस्, क्राफ्टस्, शॉप, कल्चरची पर्वणीच १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत मिळणार आहे. एक्स्पोची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, डायमंड मार्केट समोर एक्स्पो भरले आहे. यामध्ये इंटरनॅशनल, स्टेटस् पॅव्हेलियन, खादी, हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट, लाइफस्टाइल, फॅशन, इंटिरिअर, होम युटिलीटी, हाऊसवेअर, पॅकेजड् फुडस्, अँपलायसेन्स, हेल्थ आणि ब्युटी प्रॉडक्ट, गिफ्ट आर्टिकल, स्टेशनरीसह नानाविध प्रकारच्या नमुन्याच्या वस्तूचा खजिना या एक्स्पोमध्ये खुला होणार असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. या एक्स्पोसाठी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड यांच्यासह चेंबरचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह चेंबरची व्यवस्थापन समिती, कार्यकारिणी समिती, गव्हर्निग काऊन्सिल सदस्य, तज्ज्ञ समिती सदस्य परिषदेचे नियोजन करत आहे. Organized Maharashtra International Trade Expo
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी अधिक माहिती देताना म्हणाले, राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स)चे आयोजन केले आहे. या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी उद्योजक सहभागी होणार आहेत. या मायटेक्समुळे महाराष्ट्रातील व्यापार, उद्योगाचा प्रचार, प्रचार होऊन पोषण वातावरण निर्माण होऊन देशात एक नंबरचे राज्य बनविण्यात महत्वपूर्ण ठरेल. राज्यातील व्यापार उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) मार्गदर्शक आणि पथदर्शी ठरणार आहे. राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारी शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरने गेल्या ७५ वर्षापासून राज्याच्या व्यापार, उद्योगाच्या हितासाठी कार्य करत देश आणि जागतिक स्तरावर राज्यातील व्यापार उद्योगाला व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात महत्वाची भूमिका बजाविली आहे. महाराष्ट्र चेंबरचे कार्य गौरवास्पद असून राज्याच्या व्यापार उदयोगाला दिशा देणारे आहे. Organized Maharashtra International Trade Expo