रत्नागिरी, ता. 21 : कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवा ब्रह्मतर्फे छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत हा वर्ग होणार आहे. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कलागुणांना वाव देण्यासाठी योगा, श्लोक, चित्रकला, गाणी, गोष्टी, खेळ, याचबरोबर जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी, सर्प मित्र आणि इतर तज्ज्ञ मंडळीही मुलांना भेटून त्यांचे विशेष मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. Organized hobby classes by YuvaBrahm


उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं एकत्र येऊन त्यांच्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी आणि सुट्टीमध्ये होणारा मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर टाळून, त्यांना खेळ आणि विविध उपक्रम यांची गोडी लावण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे युवाब्रह्मतर्फे हा वर्ग आयोजित केला आहे. वय वर्षे ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी या कालावधीत छंद वर्ग या उन्हाळी शिबिराचे आयोजन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या नाचणे-साळवी स्टॉप येथील गोखले भवनात करण्यात आले आहे. छंदवर्गात नावनोंदणी करण्यासाठी हर्षदा – 8605167535 ओमप्रकाश- 9960375796 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. Organized hobby classes by YuvaBrahm