नांदेड येथे दि. 22 ते 26 ड़िसेंबर 2022 रोजी स. 9 ते रा. 8 वाजेपर्यत खुले
नांदेड, ता.20 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र सरकारच्या ‘8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’ या विषयांवर आधारीत भव्य बहु-माध्यम चित्र माहिती प्रदर्शानाचे आयोजन करण्यात येत आहे. भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड कार्यालयाद्वारे माळेगाव यात्रा, ता. लोहा जिल्हा नांदेड येथे दिनांक 22 ते 26 ड़िसेंबर 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असेल. Organized grand exhibition at Nanded
या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना बहु-माध्यमांद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र तसेच माहिती स्वरुपात मांडण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या 8 वर्ष निमित्त सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती या प्रदर्शनातून दर्शवण्यात येणार आहे. या प्रदर्शनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणार आहे. Organized grand exhibition at Nanded
या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता नांदेड जिल्हा पालकमंत्री तथा ग्राम विकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष माहाजन, नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी आविनाश राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदींच्या उपस्थितीत होईल. Organized grand exhibition at Nanded
या प्रदर्शनास यात्रेस येणाऱ्या भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

