पत्रकार संघातर्फे आयोजन; नगरपंचायत उपविजेता
गुहागर, ता. 28 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय निमशासकीय स्तरावरील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी घेतल्या जातात. या स्पर्धेत ग्रामीण रुग्णालय गुहागर संघ विजेता तर नगरपंचायत संघ उपविजेता ठरला. Organized cricket tournament by journalist association
या क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण रुग्णालय गुहागर संघाने नगरपंचायत गुहागर संघावर एक तर्फी मात करत विजेतेपद पटकावले. तर ग्रामीण रुग्णालय गुहागर संघाने बांधकाम उपविभाग गुहागर संघावर मात करत तर गुहागर नगरपंचायत संघाने तहसील कार्यालय गुहागर संघावर मात करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. गुहागर नगरपंचायतने प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच षटकात सलामीवीर फलंदाज आशिष कांबळे व अभिजीत मोरे यांची विकेट गमावल्याने मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ग्रामीण रुग्णालय संघाकडून कर्णधार डॉक्टर निलेश ढेरे व फलंदाजानी २२ धावांचे दिलेले उद्दिष्ट ग्रामीण रुग्णालय गुहागर संघाने सहज पार करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आशिष खांबे व उत्कृष्ट गोलंदाज डॉ. प्रशांत काळे यांची निवड करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून कल्पेश बागकर , कौस्तुभ गद्रे व प्रशांत रहाटे यांनी काम पाहिले व समालोचन दिपक देवकर यांनी केले. Organized cricket tournament by journalist association
ही स्पर्धा 2003 पासून होत असून शासकीय स्थळावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आगळी वेगळी स्पर्धा पत्रकार संघ राबवत असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांनी बक्षीस समारंभामध्ये सांगितले. विजेता व उपविजेता संघास रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी तहसीलदार परीक्षीत पाटील, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल पाटील, विभागीय पोलीस अधिकारी राजमाने, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, गाज रिसॉर्टचे मालक जितेंद्र जोशी, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे, डॉ. मंदार आठवले, कैलास वैद्य, प्रसाद वैद्य, सुहास सातार्डेकर, संतोष वरंडे, श्यामकांत खातू, पत्रकार सत्यवान घाडे, संकेत गोयथळे, गणेश धनावडे, मयुरेश पाटणकर, मंदार गोयथळे, संतोष घुमे उपस्थित होते. Organized cricket tournament by journalist association