मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, राज्यस्तरीय स्पर्धा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेच्या वतीने विधवा प्रथा बंद “माझे मत” लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची अंतिम मुदत दि. ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. हि स्पर्धा सर्वांसाठी खुली व नि:शुल्क असून ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत साहित्य व लेखन पाठवावे. असे आवाहन संजयराव कदम यांनी केले आहे. Organization of “My vote” competition on widow practice

रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता.चिपळूण) ही संस्था गेली २८ वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण व एड्स आदी क्षेत्रात विविधांगी छोटेमोठे स्तुत्य उपक्रम राबवित आहे. या संस्थेच्या वतीने यापूर्वी विधवा प्रथा बंद “माझे मत ” लेखन स्पर्धा २०२३ या शीर्षकांर्गत नियोजित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव सदर स्पर्धेची मुदतवाढ करण्यात आलेली आहे. हि स्पर्धा नि: शुल्क व सर्वांकरिता खुली ठेवण्यात आली आहे. Organization of “My vote” competition on widow practice
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना ‘ विधवा प्रथा बंद’ करण्याचे आदेश दिले आहे. तसे परिपत्रक काढून त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. ‘विधवा प्रथा बंद ‘ या आदेशाविषयी मला काय वाटते? हा स्पर्धेतील महत्त्वाचा विषय आहे. ‘विधवा प्रथा बंद’ स्वागतार्ह कि आक्षेपार्ह’ ‘माझे मत ‘लेखन स्पर्धेकरिता स्पर्धकांचे स्वतःचे विचार (मत ) कमीत कमी ३५ ते ६० ओळीचे असावे. तसेच एका स्वतंत्र कागदावर स्पर्धकांनी स्वतःचा अल्पपरिचय लिहून पाठवावा. Organization of “My vote” competition on widow practice

या स्पर्धेतील निवड झालेल्या दहा विजेत्या स्पर्धकांना स्त्री स्वातंत्र्याची युगनायिका सावित्रीबाई फुले ‘क्रांतीज्योती लेखणी सन्मान पदक व सन्मानपत्र २०२३ आणि सहभागी स्पर्धकांना सहभाग सन्मानपत्र संस्थेच्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल. साहित्य लेखन पाठविण्याचा, पत्ता : कु संघराज संजय कदम, ३०३, अजय रेसिडेन्सी, साकेत अपार्टमेंट, भूमि अभिलेख कार्यालय जवळ, पाग झरी रोड, चिपळूण, जि . रत्नागिरी ( मोबाईल नं. ९५११२७३३५५ या क्रमांकावर) PDF स्वरुपात किंवा sangharajk77@gmail.com वर पाठवावे. स्पर्धेची अंतिम मुदत दिनांक ३० ऑगस्ट २०२३ आहे. सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता या सामाजिक उपक्रमात प्रत्येक समाजघटकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे जाहिर विनम्र आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री. संजयराव शांताराम कदम यांनी प्रशिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. Organization of “My vote” competition on widow practice
