• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोलीत सायक्लोथॉन २०२३ सिझन ३ स्पर्धेचे आयोजन

by Guhagar News
April 19, 2023
in Sports
183 2
0
Organization of cyclothon event in Dapoli
359
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल; ५० लकी ड्रॉ बक्षिसे

गुहागर, ता.19 : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे समर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  रविवारी ३० रोजी दापोली समर सायक्लोथॉन २०२३ सिझन ३ स्पर्धा आझाद मैदान दापोली येथून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत. Organization of cyclothon event in Dapoli

ही स्पर्धा १ ते ६० किमी असून शॉर्ट सिटी लूप ६० किमी, कोस्टल सिनिक रूट ३० किमी, २१ किमी सायकल रेस खुला गट, महिला गट, MTB, सिंगल गिअर अशा गटात होणार आहे. सायकल रेस खुला गट बक्षिसे ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५, ३ हजार ३३३, १ हजार १११ रुपये व चषक आणि महिला गट, MTB, सिंगल गिअरसाठी प्रत्येकी ५ हजार, ३ हजार, १ हजार व चषक अशी बक्षिसे असतील. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय ५०+ लकी ड्रॉ बक्षिसे पण ठेवण्यात आली आहेत. Organization of cyclothon event in Dapoli

६० किमी सायक्लोथॉन मार्ग आझाद मैदान दापोली ते हर्णै, आंजर्ले, आडे उटंबर दापोली असा असेल. १ व २ किमीची फन राईड विनामूल्य असेल. या स्पर्धेसाठीऑफलाईन नोंदणी सुनील ऑटोमोबाईल, विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ, रसिक मोटर्स आझाद मैदान या ठिकाणी करावी. अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव, केतन पालवणकर, सूरज शेठ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Organization of cyclothon event in Dapoli

Tags: Azad MaidanCyclothonGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOrganization of cyclothon event in DapoliUpdates of Guhagarआझाद मैदानगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share144SendTweet90
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.