कंपनीचे शेतकऱ्यांना भागीदार होण्याचे आवाहन
गुहागर, ता. 03 : कृषी दिनाच्या औचित्याने शृंगारतळी येथे गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी 100 रु. मुल्याचे 10 भाग घेवून कंपनीचे भागीदार व्हावे, असे आवाहन केले आहे. Organic Producers Company in Guhagar
केंद्र सरकारने नाबार्ड अंतर्गत देशात 10 हजार शेतकरी उत्पादक संस्थांची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला आहे. या संस्थेमध्ये स्थानिक शेतकऱ्यांद्वारा जितके भागभांडवल जमा होईल तितकेच भागभांडवल केंद्र सरकार देणार आहे. गुणवत्तापूर्वक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. औषधे, खते, कृषी अवजारे यांची उपलब्धता करुन देणे. कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा विचार करणे. शेतीचे यांत्रिकीकरण करणे. शेतकरी उत्पादित करत असलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणे. शेतमाल खरेदी करणे. यामधुन शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. ही उद्दीष्टे ठेवून कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. Organic Producers Company in Guhagar
या कंपनीच्या संचालक पदी अनंत शांताराम जोयशी (कौंढर काळसूर), विश्र्वास विनायक भिडे (कौंढर काळसूर), सौ. आरती भालचंद्र जोशी (कौंढर काळसूर), हेमंत वासुदेव गुरव (शीर), संतोष भिवाजी खेतले (कुटगिरी), मंगेश सिताराम खेतले (कुटगिरी), घनश्याम सखाराम मांजरेकर (कौंढर काळसूर), अविनाश रमेश माने (खामशेत), महेश मुकुंद काटदरे (शीर) आणि तुकाराम रामचंद्र तेलगडे (पाटपन्हाळे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंदार जोशी काम पहाणार आहेत.
शृंगारतळी बाजारपेठेतील पोस्टाजवळ या कंपनीचे मुख्य कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कंपनीचे आणि कार्यालयाचे उद्घाटन नाबार्ड रत्नागिरीचे जिल्हा विकास प्रबंधक मंगेश कुलकर्णी आणि गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, मंडळ कृषी अधिकारी रोहीत चोथे, भीमाशंकर कोळी, भक्ती यादव, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे गुहागर क्षेत्रीय अधिकारी तेजस कदम उपस्थित होते. Organic Producers Company in Guhagar
काजू व नाचणी खरेदी करणार
गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने यावर्षी काजू आणि नाचणी हा शेतमाल खरेदी करण्याचे धोरण निश्चित केले आहे. याशिवायच्या शेतीमालाला थेट ग्राहक मिळवून देण्याचे काम कंपनी करणार आहे. Organic Producers Company in Guhagar