वेळणेश्वर-वाडदई ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील धोपावकर व पालशेतकर यांच्या जागेत
गुहागर, ता.12 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर-वाडदई कार्यक्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली. ही लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गावातील शेतकरी श्वेता नंदकुमार धोपावकर व जयवंत नारायण पालशेतकर यांच्या जागेत केली. यावेळी सुमारे २०० काजू व आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. व बागायतदारांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. Orchards under Employment Guarantee Scheme

ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर-वाडदई कार्यक्षेत्रात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ही फळबाग लागवड करण्यात आली. यावेळी बागायतदारांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर-वाडदईचे सरपंच चैतन्य सुधाकर धोपावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, गुहागर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार कादवडकर, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष समीर शंकर पावसकर, मच्छिमार सोसायटीचे चेअरमन सोमा नारायण तांडेल, शिवसेना शाखा प्रमुख नंदकुमार धोपावकर, वेळणेश्वर खारवी समाज माजी अध्यक्ष गजानन धोपावकर, वाडदई गावचे सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते हरिश्चंद्र कांबळे, वैभव ठाकूर, वेळणेश्वर खारवी समाजचे युवा मार्गदर्शक संदीप पालशेतकर, चंद्रकांत पालशेतकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुमारे अंदाजे २०० काजू व आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. Orchards under Employment Guarantee Scheme
