श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे संपन्न
गुहागर, ता, 04 : दि २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन, स्कूल कमिटी अध्यक्ष मा.दिपकजी कनगुटकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी मा. मुख्याध्यापक श्री एस एस कांबळे सर यांनी राजर्षी शाहू महारांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला. यावेळी पर्यवेक्षिका सौ एस एस कांबळे मॅडम, पर्यवेक्षक श्री एम एस गंगावणे व शिक्षकवृंद उपस्थित होते. Oratory and Essay Competition of Shahu Maharaj Jayanti

यावेळी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यालयातील प्राथमिक गटात वक्तृत्व आणि माध्यमिक गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – कु दुर्वा दशरथ नाटेकर ( इ ५वी / अ ), द्वितीय क्रमांक – कु स्वरा मंगेश पाटील ( इ ७वी / ब ) तृतीय क्रमांक – कु शौनक नितीन दीक्षित ( इ ५वी / अ ), उत्तेजनार्थ – कु ईशा केदार परचुरे (इ ५वी/अ ), कु साईराज सुधाकर शिंदे ( इ ६वी /अ ) तर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक – कु श्रुती मनोज जाधव ( इ ९वी / ब ), द्वितीय क्रमांक – कु मैत्रेयी मनोज शिंदे ( इ ९वी / ब ), तृतीय क्रमांक – कु वैष्णवी शरद पाटील ( इ १०वी / ब ) यांनी प्राप्त केला. Oratory and Essay Competition of Shahu Maharaj Jayanti
या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ यु पी कांबळे मॅडम व सौ जे एम माने मॅडम यांनी काम पाहिले, तर निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री पी बी जाधव सर व सौ एस एस ठाकूर मॅडम यांनी काम पाहिले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व शाळेच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. Oratory and Essay Competition of Shahu Maharaj Jayanti
