• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अग्निपथ योजनेतून तरुण पिढीला मोठी संधी

by Ganesh Dhanawade
October 6, 2022
in Guhagar
18 0
0
Opportunity through Agneepath scheme
35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माजी आ. डॉ. विनय नातू ; दुर्गादेवी नवरात्रौत्सवानिमित्त कार्यक्रम

गुहागर, ता. 06 : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेतून तरुण पिढीला मोठी संधी निर्माण झाली आहे. तरुणांना सैन्य भरतीसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी एकत्रित आले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले. दुर्गादेवी देवस्थान वतीने शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त माजी सैनिक व एनसीसी पथकाचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. Opportunity through Agneepath scheme

डॉ. विनय नातू पुढे म्हणाले की, आज केवळ सैनिकांवर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून बिनधास्त राहून चालणार नाही. तर सागरी सीमा आपल्या जवळ आहेत. दहशतवाद लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. त्रिदल सैनिक संघ बीडचे जिल्हाध्यक्ष अंकुश खोटे यांनी माजी सैनिकांनी एकत्र येऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले पाहिजे. यासाठी त्रिदल सैनिक संघ कायम आपल्या बरोबर राहील असे त्यांनी सांगितले. दुर्गादेवी देवस्थानने सर्व माजी सैनिकांच्या घरी पोहोचून आमची दखल घेतली याबत माजी सैनिक राजेश कोळवणकर यांनी आभार मानले. Opportunity through Agneepath scheme

यावेळी दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, त्रिदाल सैनिक संघाचे अंकुश खोटे, संदीप लगड, विनोद कासार, हाजीमलंग शेख, गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, केदार साठे, तालुका होमगार्ड समादेशक सुधाकर कांबळे, देवस्थानचे विश्वस्त डॉ. आनंद खरे, संतोष मावळणकर, अतुल फडके, अद्वेत गोखले, अमोद गोळे आदी उपस्थित होते. Opportunity through Agneepath scheme

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarOpportunity through Agneepath schemeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.