विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावर आक्रमक; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ
मुंबई, ता. 17 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, हे सरकार खातेवाटपात आणि दिल्लीवारीत व्यस्त असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. Opponents are aggressive on the issue of farmers
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष आहे, कुठल्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे उत्तर दिले. दरम्यान विरोधकांकडून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग करण्यात आला. यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. शेतकरी आवाज दांबनाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी सभागृहात काँग्रेसकडून कऱण्यात आली. शेतकऱी प्रश्नावर घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला. Opponents are aggressive on the issue of farmers
कुठल्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पेरण्या कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज आहे. राज्यात पेरण्या कमी झाल्या तर त्यासाठी सरकारकडून प्लान तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. बोगस बियानांवर कारवाई होईल. या संदर्भात कायदा अधिक कठोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक व्यवस्था आपण सुरू केली आहे, ज्यानुसार बियाने, खते यात बोगसगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या संदर्भात संबंधितांना अपात्र करून त्यांच्यावर कायदेशीर करावाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. Opponents are aggressive on the issue of farmers
राज्यातील शेतकरी हवालदिल, सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही; बाळासाहेब थोरात
आज 17 जुलै आहे. आजची स्थिती अशी आहे की, राज्यातील बहुतांश भागात पाऊस नाही. पेरण्या केवळ 20 टक्के झाल्या आहेत. सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. राज्यात हप्तेगिरी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. Opponents are aggressive on the issue of farmers
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षाने विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आधी होते खोके सरकार, आता झाले बोके सरकार, अशा आशयाच्या घोषणाबाजी विरोधीपक्षांतील आमदारांकडून करण्यात आली. Opponents are aggressive on the issue of farmers
आमच्यात कोणतीही अस्वस्थता नाही- संजय गायकवाड
विरोधक काय टीका करतात त्याची आम्ही परवा करत नाही. आता आमचे सरकार मजबूत झालेले आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली, त्यामुळे आमच्यात कोणतीही अस्वस्थता नाही. जागावाटपाला बराच वेळ आहे. जागावाटप आम्ही समान करू. शेतकऱ्यांचा आम्ही नक्कीच विचार करू. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नवीन कृषिमंत्री असले तरी सभागृह या संदर्भात योग्य निर्णय घेईल असे संजय गायकवाड म्हणाले. Opponents are aggressive on the issue of farmers