• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 November 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच डॉक्टर

by Mayuresh Patnakar
November 14, 2026
in Ratnagiri
36 1
0
71
SHARES
203
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.  : राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी १,४५० डॉक्टरांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असताना प्रत्यक्षात १,३०९ डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. मात्र, या भरतीत रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच डॉक्टर आल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांची तीव्र कमतरता असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला अत्यंत तुटपुंजी संधी मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्राधान्यक्रमात रत्नागिरी जिल्हा नेमका कुठे आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. Only five doctors for Ratnagiri

राज्यात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या १,३०९ डॉक्टरांमध्ये ८१० एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, १७९ स्त्रीरोगतज्ज्ञ,१४० बालरोगतज्ज्ञ, १२२ भूलतज्ज्ञ, ४७ शल्यचिकित्सक, आठ नमूद नसलेले विशेषज्ञ, एक त्वचारोगतज्ज्ञ, एक पॅथॉलॉजिस्ट आणि एका रक्त संक्रमण अधिकाऱ्याचा समावेश आहे. कोल्हापूर विभागासाठी एकूण ५१ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असताना त्यापैकी अवघे पाच डॉक्टर रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहेत. विभागातील सर्वाधिक कमी नियुक्त्या रत्नागिरी जिल्ह्यात झाल्याचे चित्र आहे. Only five doctors for Ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्यात तीन उपजिल्हा रुग्णालये, आठ ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा परिषदेची ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. दापोली, चिपळूण आणि खेड येथील उपजिल्हा रुग्णालयांसह राजापूर, रायपाटण, लांजा, पाली, संगमेश्वर, देवरूख, गुहागर आणि मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र, अनेक ठिकाणी आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होत आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पाच डॉक्टरांमध्ये गुहागर येथे एक स्त्रीरोगतज्ज्ञ, राजापूर आणि रायपाटण येथे प्रत्येकी एक बालरोगतज्ज्ञ, तर जिल्हा रुग्णालय आणि गुहागर तालुक्यातील कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी एक एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, चिपळूण, खेड आणि दापोली या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रांवर एकाही विशेषज्ञ डॉक्टराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील रुग्णांना विशेषज्ञ उपचारांसाठी अन्य ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयाचे महत्त्व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने अधिक आहे. महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी हे रुग्णालय महत्त्वाचा आधार ठरू शकते. मात्र, आवश्यक विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने व्हेंटिलेटरसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांचाही अपेक्षित वापर होत नसल्याची स्थिती आहे. दापोली आणि खेड येथील रुग्णालयांमध्येही बाह्यरुग्ण विभागात मोठी गर्दी असताना विशेषज्ञ डॉक्टरांचा अभाव जाणवत आहे. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उपलब्ध असले, तरी जिल्ह्याच्या उत्तर भागातील दापोली, खेड आणि मंडणगड परिसरातील रुग्णांसाठी ते सुमारे १६० ते १६५ किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक आजारासाठी रत्नागिरीपर्यंत रुग्णांना आणणे आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरते. त्यामुळे स्थानिक उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे ही केवळ प्रशासकीय गरज नसून रुग्णांच्या जीविताशी संबंधित बाब आहे. Only five doctors for Ratnagiri

रत्नागिरी हा पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना, डोंगराळ भाग, दुर्गम गावे, लांबचे अंतर आणि महामार्गावरील अपघातांची शक्यता लक्षात घेता येथे सक्षम आरोग्य यंत्रणेची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात डॉक्टरांच्या नियुक्तींमध्ये जिल्ह्याच्या वाट्याला आलेली पाच डॉक्टरांची संख्या पाहता आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या गरजाकडे दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त होत आहे. Only five doctors for Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarOnly five doctors for Ratnagiriटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.