रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/ माजी सैनिकांचे अवलंबित तसेच नव्याने सेवानिवृत्त होणारे सैनिक यांना कळविण्यात येते की, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून प्राप्त होणारे ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी शासनाने संगणकीकृत ऑनलाईन पध्दतीचा वापर केला आहे. त्यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेत स्थळाचा वापर करून संबंधितानी स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. सदर रजिस्ट्रेशनसाठी फक्त माजी सैनिकास १०० रुपये एवढी रक्कम फी स्वरूपात ऑनलाईन पध्दतीने आकारण्यात येईल. Online Registration of Ex-Serviceman Identity Card

रजिस्ट्रेशन करणेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, संपूर्ण पानासहीत डिश्चार्ज बुक, पी.पी.ओ, पेन्शन पासबुकाचे पहिले पान, इ.सी. एच एस. कार्ड, दोन फोटो आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावीत. तरी सर्व संबंधितानी नवीन ओळखपत्र बनविणेसाठी उपरोक्त संकेतस्थळावर आपले रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. Online Registration of Ex-Serviceman Identity Card

