• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी

by Mayuresh Patnakar
August 17, 2021
in Old News
94 1
0
घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी
184
SHARES
525
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि गुहागर न्यूज यांच्या संयोजनातून घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी हा एक महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. तरी सामाजिक माध्यमांमध्ये लिखाण करणाऱ्या आणि वेगवेगळ्या विषयावर लिखाण करणाऱ्या व्यक्तिंनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी केले आहे.
आज एखादा विषय सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी स्मार्ट फोन हे प्रभावी माध्यम झाले आहे. फेसबुक, व्हॉटसॲप आदी सामाजिक माध्यमांमध्ये व्यक्त होण्याची इच्छा सर्वांचीच असते. आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टी आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रीणींपर्यंत पोचवाव्या असे मनापासून वाटते. पण मनातील भावना योग्य पध्दतीने व्यक्त कशा करायच्या असा प्रश्र्न पडतो. या प्रश्र्नाचे उत्तर मिळवून देण्यासाठीच खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि गुहागर न्यूजने घरबसल्या पत्रकारिता हा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
या अभ्यासक्रमामध्ये पत्रकारितेशी निगडीत सर्व विषयांची ओळख, त्यातील बारकावे शिकवले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्र निवडायचे असेल तर प्राथमिक ज्ञानही मिळणार आहे. 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत रोज सायंकाळी 5 ते 6 ही या अभ्यासक्रमाची वेळ आहे. प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे पत्रकारीतेचे चार भाग (मॉड्युल्स्‌) शिकवले जातील. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रु. 200 व अन्य व्यक्तींसाठी रु. 350 प्रवेश फी आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2021 आहे. तरी या लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
प्रा. विराज महाजन : 7066840767 प्रा. पद्मनाभ सरपोतदार : 8010069425

प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://forms.gle/HhDDoASULPkgQ3886  

Tags: Breaking NewsCollegeGuhagarGuhagar NewsJournalism CourseLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiOnlineटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share74SendTweet46
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.